प्रा. रमेश अ. गाडेकर यांना पीएच.डी प्रदान तसेच संशोधनादरम्यान पेटंट मिळवले.
प्रा. रमेश अ. गाडेकर यांना पीएच.डी प्रदान तसेच संशोधनादरम्यान पेटंट मिळवले.
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
मेंगलवाडी, राजापूर येथील प्रा. रमेश अभिमन्यू गाडेकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने औषध निर्माण शास्त्र विषयातील सर्वोच पदवी पीएच.डी प्रदान केली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने त्यांनी हे यश मिळवले. प्रा. डॉ. रमेश अभिमन्यू गाडेकर हे पीएच.डी मिळवणारे त्यांचे गावातील पहिलेच विद्यार्थी आहेत. ‘डिझाइन अँड इव्हाल्युएशन ऑफ इलेकट्रोस्पून नॅनोफायबर बेस्ड ड्रग डिलिव्हरी सिस्टिम’ हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. मधुमेहासारख्या असाध्य आजारावर संशोधन करताना वेदनादायी इन्सुलिन चे इंजेक्शन न घेता फक्त नाकावाटे घेण्याचे आधुनिक इन्सुलिन ड्रॉप त्यांनी विकसित करून त्याचे पेटंट देखील मिळवले. तसेच त्यांचे ३ संशोधनपर शोधनिबंध स्कोपस इंडेक्स तसेच यु.जी.सी सारख्या राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय दर्जाच्या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले असून अनेक परिसंवाद व परिषदांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग देखील नोंदवला आहे. या कामी त्यांना शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. अजय शिंदे यांनी मार्गदर्शन केले. तसेच पीडीईए चे सेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी, सासवड या त्यांचे संशोधन केंद्राचे प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. प्रा. डॉ. रमेश गाडेकर हे केजेईआई, ट्रिनिटी कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे येथे सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांचे या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य डॉ. संजय चौधरी तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच पद्मविभूषण मा.अण्णासाहेब हजारे, मा. निलेश लंके, खासदार-अहमदनगर दक्षिण, सौ. राणीताई लंके, मा.जि.प.सदस्या व तसेच राजापूर गावचे सरपंच प्रतिक्षा धनंजय मेंगवडे व इतर समस्त ग्रामस्थ मेंगलवाडी-राजापूर मित्र परिवार यांनी अभिनंदन केले.
