Uncategorized

ढवळगाव येथील ओंकार शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा लि .चा बॉयलर अग्निप्रदिपन व मोळी पुजन सोहळा संपन्न

ढवळगाव येथील ओंकार शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा लि .चा बॉयलर अग्निप्रदिपन व मोळी पुजन सोहळा संपन्न

मुख्यसंपादक – अमोल बोरगे / प्रतिनिधी –

श्रीगोंदे तालुक्यातील ढवळगाव येथीलओंकार शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा लि युनिट नं ७ चा हंगाम २४ ते२५ बॉयलर अग्निप्रदिपन व मोळी पुजन सोहळा चेअरमन बाबुराव बोत्रे रेखा बोत्रे तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या अकरा मुलीच्या हस्ते करण्यात आला .
या वेळी गौरी शुगरचे जनरल मॅनेजर रोहीदास यादव यांनी प्रास्ताविक करताना परिसरातील गावातील उस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय बोत्रे यांनी घेतला . परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त होताना दिसत होता . एक चाक फिरले तर अनेकांचे प्रपंचाला हातभार लागतो ही संस्था परिसरासाठी कामधेनू आहे . शेतकऱ्यांची प्रमुख धामणी आहे संयोग्य बाजारभाव ‘योग्य नियोजन ,कामगार ,उस वहातुकदार , उसतोडणी यंत्रणा , बॅक कर्ज व्याज ही पंचसुत्री डोळ्यासमोर ठेवूनचकारखानदारी करावी लागते .
दिवाळी निमित्त मोफत साखर वाटप केली . कुणाचेही कसल्याही पद्धतीचे देणे बाकी नाही .जिल्हयात सर्वात जास्त बाजारभाव ३००६ दिल्याचा विक्रम आहे . त्यामुळे इतर कारखान्यां पुढे आदर्श उभा केला असल्याचे मत व्यक केले .
मनोगत सोमनाथ खेडकर ,सुधिर घेगडे , अशोक ईश्वरे , सुनिल महाडिक, ह .भ .प . भास्कर कदम ,दिनकर पंदरकर आदींनी व्यक्त केले .
यावेळी ‘ प्रशांत बोत्रे , सचिन चौधरी , रविंद्र शिंदे ,काशिनाथ कौठाळे , सतिश धावडे , केशव महाडिक , इंद्रभान खेडकर ‘ राजेंद्र कातोरे, नारायण निंबाळकर , गणेश डोईफोडे, आदी सह परिसरातील बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते . काररखान्याचे चिफ केमिस्ट ,चिफ इंजिनिअर ‘ चिफ अकाऊंन्टन मुख्य शेतकी अधिकारी तसेच प्रत्येक विभागातील कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नवनाथ देवकर आभार जनरल मॅनेजर अजित देशमुख यांनी मानले .
जिल्ह्यात उच्यांकी भाव दिला जाईल असे आश्वासन दिले .

एक दोन दिवस उसतोड मागे पुढे होईल परंतु सर्वांचा उस तोडला जाईल

उसतोडी कामगारांना कुठल्याही प्रकारचे पैसे देऊ नये ‘ जेणे करून त्याचा त्रास कर्मचाऱ्यांना होतो . एक दोन दिवस उसतोड मागे पुढे होईल परंतु सर्वांचा उस तोडला जाईल याची उस उत्पादक शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी बाजारभावा बरोबर याही वर्ष मोफत साखर वाटप केली जाईल .

श्री.बाबुराव बोत्रे ( चेअरमन ओंकार शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा.लि )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!