आश्वासनानंतर ॲड. गायकवाड यांचे उपोषण मागे
आश्वासनानंतर ॲड. गायकवाड यांचे उपोषण मागे
प्रतिनिधी :- सुदाम दरेकर पारनेर :–
देवी भोयरे येथील सामाजिक कार्यकर्ते नितेश गायकवाड यांनी गेली चार दिवस देवीभोयरे आणि परिसरातील अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी नगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ उपोषण सुरू केले होते. चौथ्या दिवशी त्यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घागे’ यांची भेट घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक घागे’ यांनी अवैध धंदे बंद करण्याच्या आश्वासन दिले. त्यानंतर उपोषण मागे घेतले असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, एक महिन्यापूर्वी पारनेर येथे अवैध धंदे विरोधात उपोषण करण्यात आले होते. त्यानंतर अवैध धंदे करणाऱ्या लोकांच्या विरोधात थातूरमातूर कारवाई करण्यात आली. पाच दिवसापूर्वी शेजारच्या लोकांनी चुलत्याच्या घरावर दारू आणून ठेवली. त्यानंतर पारनेर व निघोज पोलिसांनी चुलत्याच्या घरी छापा टाकला. आमच्यावर कारवाई केली तसेच पोलिसांनी घरातील महिलांना अर्वाच्य भाषेत संवाद साधत अपमानित केले. त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची लेखी मागणी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे त्यांनी केली असल्याची माहिती अडवोकेट नितेश गायकवाड यांनी दिली..
