निर्भीड व संवेदनशील पत्रकार सुरेश खोसे पाटील यांचा प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांच्या वतीने जाहीर सत्कार
निर्भीड व संवेदनशील पत्रकार सुरेश खोसे पाटील यांचा प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांच्या वतीने जाहीर सत्कार
अळकुटी :- प्रतिनिधी :- सुदाम दरेकर पारनेर :-
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असतो. पत्रकार बांधव आपल्या जीवाची बाजी लावून सत्यवृत्त हे समाजापर्यंत पोहोचवितात. निर्भीड, जाज्वल्य व संवेदनशील पत्रकार व संपादक म्हणून सुरेश खोसे पाटील यांचा नावलौकिक आहे. सुरेश खोसे पाटलांची नुकतीच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारिणीवर निवड झाली आहे. यापूर्वी पासून सुरेश खोसे पाटील अहिल्यानगर जिल्ह्याच्या कार्यकारिणी वर जिल्हा सचिव म्हणून कार्यरत आहेत . याप्रसंगी त्यांनी अहिल्यानगर मधील विशेषतः पारनेर तालुक्यात मुत्सद्दी पत्रकार म्हणून नावलौकिक कमावला आहे. एकूणच सुरेश खोसे पाटील हे निर्भीड व संवेदनशील पत्रकार व संपादक आहेत , असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी केले.
पद्मभूषण लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अळकुटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे भारतीय ज्ञान व्यवस्थेबाबत बहुविद्याशाखीय दृष्टिकोन या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार सुरेश खोसे पाटील यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. प्राचार्या डॉ. कुंदा कवडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ. कवडे यांनी सुरेश खोसे पाटलांच्या पत्रकारितेचे कौतुक केले व त्यांच्या रूपाने प्रथमच पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील पत्रकाराला राज्य पातळीवर प्रथमच काम करण्याची संधी मिळाली .
या कार्यक्रमाप्रसंगी डेअरी डिप्लोमा प्राचार्य प्रा. प्रशांत लोखंडे, प्रा. विशाल रोकडे, श्री गोरख घोलप, प्रा. अर्जुन चाटे, प्रा. संजय जाधव, प्रा. स्वाती फापाळे, प्रा. दशरथ पानमंद, प्रा. पांडुरंग उघडे, प्रा. सचिन बलसाने, प्रा. सुनिता जाधव, प्रा. विनायक सोनवणे, प्रा. पोपट सुंबरे, प्रा. दत्तात्रय शेळके, प्रा. रावसाहेब झावरे, प्रा. ऋषिकेश गिते, प्रा. शर्मिष्ठा बोरुडे, डॉ. शांता थोरात, प्रा. प्रियंका दिवटे, प्रा. शिवाजी शेळके, प्रा. सुषमा करकंडे, प्रा. अनुराधा गाढवे, प्रा. मोहन माने, प्रा. राजाराम गोरडे, प्रा. तांबे, सुनिता भालेराव, प्रा.पूजा वैरागर, प्रा. सुप्रिया पारखे, सूर्यमाला भोर, नितीन घोलप, छाया म्हस्के, विकास सोनवणे, राहुल बोरुडे आणि प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पूजा वैरागर, प्रा. सुनिता जाधव, प्रास्ताविक डॉ.कुंदा कवडे तर आभार प्रा.विशाल रोकडे यांनी केले.
