लहुजी शक्ती सेनेचे श्रीगोंदा तहसील समोर हलगीनाद आंदोलन
लहुजी शक्ती सेनेचे हलगीनाद आंदोलन.
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
मौजे भावडी तालुका श्रीगोंदा येथील ग्रामपंचायत मालकीच्या विहिरीची नोंद त्वरित करण्यात यावी, त्या विहिरीचा पाणीपुरवठा मोटर टाकून पूर्ववत चालू करावा, व सदर विहिरीची पाहणी करून जन सुनावणी त्वरित करण्यात यावी यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेना श्रीगोंदा व भावडी ग्रामस्थांच्या वतीने पंचायत समिती श्रीगोंदा येथे दिनांक 30/6/25 रोजी हलगी नाद आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाला भावडी ग्रामस्थ
ॲड. सुनील भोस, भावडी ग्रा.पं. सदस्य दत्तात्रय शिंदे,अर्जुन करनोर , घनश्याम काळे,
संदीप शिंदे ,पंकज शिंदे, अशोक शिंदे, नाना शिंदे, बापूराव शिंदे, जनार्दन चव्हाण, प्रदीप खामगळ,आविदा शिंदे , वैशाली शिंदे,अलका शिंदे, लक्ष्मीताई शेलार,
लहुजी शक्ती सेनेचे अहिल्यानगर जिल्हा युवक अध्यक्ष उत्तम आप्पा रोकडे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष नवनाथशिंदे, बहुजन समता पार्टीचे महाराष्ट्र राज्य सचिव वसंतराव सकट, सरपंच मीनाक्षी ताई सकट,प्रा.बापूसाहेब गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे ता.अध्यक्ष श्याम झरे,
रामदास मोरे,संतोष शेंडगे,वसंत आवचिते, प्रवीणकुमार शेंडगे, गणेश लोंढे, मनोज शेलार,हर्ष आढागळे,आणि अनेक लहु सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते वरील मागण्या आठ दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन श्रीगोंदा तहसीलदार प्रविण मुदगुल व गटविकास अधिकारी राणी फराटे, यांनी लेखी स्वरूपात आंदोलन करत्यांना दिले, जर या मागण्यापूर्ण झाल्या नाहीतर तीव्र स्वरूपाचे आंदोलन पंचायत समिती समोर करण्यात येईल असा इशारा जिल्हा युवक अध्यक्ष उत्तम आप्पा रोकडे यांच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला.
