ऑनलाईन फसवणूक या विषयावर प्रा.अरुण दिवटे यांचे विशेष हिवाळी शिबिरामध्ये चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील मुलांना केले मार्गदर्शन
ऑनलाईन फसवणूक या विषयावर प्रा.अरुण दिवटे यांचे विशेष हिवाळी शिबिरामध्ये चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील मुलांना केले मार्गदर्शन
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे चांदमल ताराचंद बोरा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटरसी या उपक्रमांतर्गत मौजे देवदैठण येथील विशेष हिवाळी शिबिरामध्ये प्रा. अरुण दिवटे यांनी ऑनलाईन फसवणूक या विषयावर व्याख्यान दिले.
यावेळी प्रा. अरुण दिवटे यांनी सांगितले की, आजच्या तरुण पिढीला डिजिटल व्यवहारात दक्ष राहणे आवश्यक आहे त्यांना या पासून लांब जाता येणार नाही त्याच्यासाठी हे डिजिटल युग आहे. देशात डिजिटल व्यवहारात ज्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे त्याप्रमाणे हे डिजिटल व्यवहारात अनेक प्रकारे मोठ्या संख्येने लोकांची फसवणूक होताना दिसून येते आहे. आपली कोणकोणत्या प्रकारे फसवणूक केली जाते आणि आपण यातून योग्य मार्ग काढून आपली फसवणूक कशा प्रकारे थांबवू शकतो यावर आज प्रा. अरुण दिवटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी यादरम्यान काही प्रात्यक्षिक व्यवहार करून दाखविले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. अशोक काकडे यांनी केले. यावेळी डॉ. सिद्धार्थ कांबळे, डॉ. रेणुका करपे, प्रा. दिलीप टोणगे, प्रा. रतनकुमार ससाणे, प्रा. अमोल पितळे. प्रा. प्रवीण घुंबरे, संजय भोकटे, खोडके अविनाश उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी रोडे तसेच आभार विकास कापुरे यांने केले.
