ताज्या घडामोडी

सुपा औद्योगिक वसाहतीतील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतीयांच्या वाढत्या संख्ये विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक- मनसे नेते अविनाश पवार

सुपा औद्योगिक वसाहतीतील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतीयांच्या वाढत्या संख्ये विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक- मनसे नेते अविनाश पवार

आठ दिवसांत सुपा औद्योगिक वसाहतीतील परप्रांतीय कामगारांचे कंपनी व्यवस्थापनाने पोलिस व्हेरिफिकेशन केले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कामगारांना कंपनी मध्ये काम करु दिले जाणार नाही – मनसे नेते अविनाश पवार

सुपा प्रतिनिधी – प्रतिक शेळके

 सुपा औद्योगिक वसाहतीतील वाढत असलेली मोठ्या प्रमाणात परप्रांतीय लोकांची संख्या सुपा गावांसह परिसरातील आजु बाजुच्या वाघुंडे,पळवे,रुईछत्रपती,बाबुर्डी,म्हसणे,हंगा गावांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक बनली आहे परप्रांतीयाना कसल्याही प्रकारचा कायद्याचा धाक राहिलेला नसल्याने हे लोक बिनधास्त पणे दारुचे सेवन करुन परिसरात वास्तव्य करत आहे यांची कुठेही कसल्याही प्रकारची नोंद नसल्याने बनावट आधार कार्ड वापर करून हे लोक स्थानिक एजंट च्या माध्यमातून सुपा औद्योगिक वसाहती मधील कंपन्यांमध्ये सहज काम मिळवतात व कंपनी पण कुठल्याही प्रकारचे पोलिस व्हेरिफिकेशन न करता या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कामावर घेतले जाते आहे हे आसपासच्या परिसरातील गावांच्या सुरक्षिततेसाठी दुर्दैवी व घातक आहे या लोकांकडून परिसरातील तरुण मुलीं, महिला यांना फुस लाऊन पळवून नेले जात आहे त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच दिवसेंदिवस गावांत भुरट्या चोरी करणाऱ्या चोरट्यांचा मुक्त संचार दिवसेंदिवस वाढतच आहे हे सर्व रोखण्यासाठी परिसरात वास्तव्य करणाऱ्या परप्रांतीय लोकांकडून ज्या गावांमध्ये हे लोक वास्तव्यास आहेत त्या ग्रामपंचायतीला या लोकांचं पोलिस व्हेरिफिकेशन बंधनकारक करण्यात यावे बिना पोलिस व्हेरिफिकेशनच्या परप्रांतीय कामगारांना गावात वास्तव्यास राहु देऊ नये तसेच सुपा एम आय डी सी मधील कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशन बंधनकारक करण्यात यावे बिना पोलिस व्हेरिफिकेशनच्या परप्रांतीय कामगारांना कंपनी मध्ये प्रवेश देण्यात येणार नाही याचा कंपनी व्यवस्थापन व पोलिस प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा जर ८ दिवसांत सुपा परिसरातील गावांच्या महिला- मुलींच्या सुरक्षेसाठी तसेच परिसरातील गावांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस व्हेरिफिकेशन पोलीस प्रशासनाने घ्यावं आणि केलेल्या कारवाईचा लिखित स्वरूपात खुलासा करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुपा एम आय डी सी मधील एका ही कंपनी मध्ये काम करणाऱ्या कामगारांना बिना पोलिस व्हेरिफिकेशनचा प्रवेश दिला जाणार नाही या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर यास पुर्ण पणे ज्या कंपनी चे कामगार असतील ती कंपनी व्यवस्थापन व पोलिस प्रशासन जबाबदार राहील असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी सुपा पोलिस प्रशासनाला निवेदन देऊन दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!