नगर पुणे हायवेवर लागणाऱ्या मूलभूत आणि योग्य त्या सुविधा द्या अन्यथा टोल बंद करा…… रविश रासकर यांचा उपोषणाचा इशारा
नगर पुणे हायवेवर लागणाऱ्या मूलभूत आणि योग्य त्या सुविधा द्या अन्यथा टोल बंद करा…… रविश रासकर यांचा उपोषणाचा इशारा
प्रतिनिधी/प्रतिक शेळके:-
रविश रासकर यांनी नगर शिरूर हायवे वर लागत असणाऱ्या मूलभूत योग्य त्या सुविधा द्या अन्यथा प्रवासी वाहतूक व मालवाहतूक गाड्यांकडून टोल पावत्या घेणे बंद करा. असा इशारा दिला आहे. नगर शिरूर हायवे वरती ठीक ठिकाणी डिव्हायडर फोडलेले आहेत व कुठल्याही अधिकृत डिव्हायडर वर रस्ता क्रॉस करताना लायटिंग पट्टी नाही. सूचना फलक व दिशादर्शक फलक नाहीत . गावाच्या ठिकाणी जेथे अधिकृत डीवाईडर आहे तेथे प्रत्येक ठिकाणी दोन्ही साईडकहुन स्पीड ब्रेकर पण नाहीत. सुपा टोल नाक्यावर जेसीबी, ॲम्बुलन्स, क्रेन या प्रकारची इमर्जन्सी कुठलीही सुविधा उपलब्ध नाही. तसेच जातेगाव फाटा या ठिकाणी कायमस्वरूपी मोठ मोठाले एक्सीडेंट होतात. अनेक निष्पाप मनुष्यहानी होऊन प्रवासी मृत्युमुखी पडलेले आहेत. तीन दिवसांपूर्वी नितीन शेळके नावाचा युवक जातेगाव फाट्यावर रस्ता क्रॉस करताना कुठल्याही प्रकारचे लाइटिंग पट्टी सूचनाफलक आणि स्पीड बेकार नसल्यामुळे एक्सीडेंट होऊन मृत्युमुखी पडला. याला कारणीभूत सर्वस्वी सुपा टोल नाका मॅनेजमेंट जबाबदार आहे.
त्यानंतर नगर पुणे हायवे वर सुपा टोल मॅनेजमेंटच्या अधिपत्याखाली रोडवर प्रवाशांना व गाड्यांना प्रत्येक प्रकारच्या सुख सुविधा दिल्या गेल्या पाहिजे . रोडवरील सूचनाफलकांवर अनावश्यक होल्डिंग लावले गेले नाही पाहिजे. १५ दिवसानंतर पत्रव्यवहार करून रविश रासकर हे सुपा टोल नाक्यावर बेमुदत आमरण उपोषणाला बसतील… असा इशारा सुपा टोल नाका प्रशासनाला रविश रासकर यांनी दिलेला आहे.
