पिकांचे व नुकसानग्रस्त घरांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आमदार काशिनाथ दाते सर यांचे आदेश
पिकांचे व नुकसानग्रस्त घरांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आमदार काशिनाथ दाते सर यांचे आदेश .
पारनेर :- प्रतिनिधी :- सुदाम दरेकर
पारनेर :- नगर तालुक्यातील खडकी, अकोळनेर, सारोळा कासार येथे मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास अतिवृष्टी झाल्यामुळे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मंगळवारी दुपारी झालेल्या अतिवृष्टीमुळे या गावांमध्ये पुर परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतात व घरामध्ये पाणी गेले आहे . शेत जमीन व शेती पिके वाहून गेल्यांने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरांचे लहान मोठ्या स्वरूपात नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी आ . काशिनाथ दाते सर यांनी संवाद साधत व्यथा जाणून घेऊन आम्ही सर्व तुमच्या सोबत आहे , असा शेतकऱ्यांना धीर देत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश नगर तालुका तहसीलदार संजय शिंदे यांना दिले आहेत.
अतिवृष्टीमुळे खडकी, अकोळनेर, सारोळा कासार परिसरात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात कांदे पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली जनावरे , शेळया, मेंढ्या, गोठा , पत्रे पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले आहे .गावातील रस्ते , पुल, बंधारे वाहून गेले आहेत , तर वीज वितरण व्यवस्थेचे देखील मोठे नुकसान झाले.
अनेकांच्या घराचे पत्रे उडून संसार उघड्यावर आले आहेत. खडकी परिसरात झाडे उन्मळून पडली कांदा, टॉमॅटो, बिजली झेंडु यांसह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे . विजेचे पोल पडून वीजपुरवठा खंडित झाला असून खडकी परिसरात १५ हुन अधिक विजेचे पोल पडले आहेत.
खडकी, अकोळनेर, सारोळा कासार या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे ओढ्या नाल्यांचे पाणी घुसून अथवा पाणी साठून ज्या पिकांचे अथवा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तेथे तहसीलदारांनी खात्री करून पंचनामे करावेत , अशा सूचना केलेल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार आहे .
आमदार कशिनाथ दाते सर .
