खा.निलेश लंके यांचे मार्गदर्शनाखाली व नगरसेविका हिमानी नगरे यांच्या प्रयत्नातून पारनेर येथे अनोखा उपक्रम ! खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जलशुद्धीकरण केंद्राचा शुभारंभ ! पारनेर प्रतिनिधी / प्रतिक शेळके :-
खा.निलेश लंके यांचे मार्गदर्शनाखाली व नगरसेविका हिमानी नगरे यांच्या प्रयत्नातून पारनेर येथे अनोखा उपक्रम !
खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जलशुद्धीकरण केंद्राचा शुभारंभ !
पारनेर प्रतिनिधी / प्रतिक शेळके (सुपा ):-
नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार निलेश लंके हे देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने प्रत्येक वर्षी वेगवेगळे समाजाभिमुख उपक्रम राबवत असतात .त्याचप्रमाणे याही वर्षी गुरुवारी शरद पवार यांचा वाढदिवसाचे औचित्य साधत सर्व आरोग्य सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या आरोग्य रथाचे लोकार्पण करत ,नेत्रतपासणी शिबिराचे संपूर्ण मतदार संघात आयोजन करण्यात आले आहे .दिनांक 12 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालावधी मध्ये प्रत्येक गावात नेत्र तपासणी असो की नेत्र रुग्णांना चष्मे वाटप असो किंवा शालेय विद्यार्थ्यांना शेकडो सायकलींचे वाटप असो की वृद्धांना काठी वाटप असो या विविध उपक्रमांद्वारे खासदार शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे .
शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पारनेर नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक नऊ मधील नगरसेविका हिमानी नगरे यांच्या प्रयत्नातून जलशुद्धीकरण केंद्र व बोअरवेलचा उद्घाटन समारंभ गुरुवारी संपन्न झाला .नगरसेविका हिमानी रामजी (बाळासाहेब) नगरे यांच्या प्रयत्नातून कम्युनिक इंडिया फाउंडेशनच्या वतीने उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचा आणि जैन समाज पारनेर यांच्या सहकार्याने उभारलेल्या बोअरवेलचे खासदार डॉ.निलेशजी लंके साहेब यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या सौ.राणीताई लंके यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.या जलशुद्धीकरण केंद्रास नगरे परिवाराने जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच नगरपंचायतचे पाणीपुरवठा सभापती योगेश मते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर व इतर नगरसेवकांनी बोअरवेल व मोटर साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल राणीताई लंके यांनी त्यांचे अभिनंदन केले .
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक राहुल नगर पारनेर येथे सुरू झालेल्या या जलशुद्धीकरण केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सौ. राणीताई निलेश लंके यांच्यासह पारनेर नगरपंचायतचे अध्यक्ष , उपाध्यक्ष सर्व नगरसेवक व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
