पारनेर तालुक्यातील देविभोयरे येथील सहकारी साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणी आरोपींच्या अटकेसाठी पारनेरला उपोषण
पारनेर तालुक्यातील देविभोयरे येथील सहकारी साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणी
आरोपींच्या अटकेसाठी पारनेरला उपोषण
पारनेर प्रतिनिधी / प्रतिक शेळके
पारनेर तालुक्यातील देविभोयरे येथील सहकारी साखर कारखाना विक्री
गैरव्यवहार प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून, त्यातील आरोपींना अटक करावी, गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक नेमावे. सध्याचे तपासी अधिकारी समिर बारवकर यांच्याकडून तपास काढून घ्यावा . अशा विविध मागण्या घेऊन फिर्यादी अँड. रामदास घावटे यांनी पारनेर पोलीस ठाण्या समोर उपोषण चालू केले आहे. दाखल गुन्ह्याचा तपास हा अत्यंत गुंतगुंतीचा आहे. मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांशी संबंधित आहे. यात काही बनावट कागदपत्रे तयार करण्यात आलेली आहेत. त्यामुळे आरोपींना अटक करणे गरजेचे आहे. म्हणून या गुन्ह्याचा सखोल तपासाची उपोषणकर्ते घावटे व कारखाना बचाव समिती यांनी मागणी केली आहे. आरोपींच्या अटकेपर्यंत उपोषण चालूच राहील अशी भूमिका देखील उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. उपोषणा उपोषणाला तालुक्यातील शेतकरी
सभासदांनी मोठ्या प्रमाणे पाठिंबा दिलेला आहे. यावेळी कारखाना बचाव या कारखाना समितीचे साहेबराव मोरे, बबनराव सालके, संभाजीराव सालके, गोविंद बडवे, रामदास सालके, सुदाम जाधव, तुकाराम तनपुरे, दत्तात्रय पवार, संजय वाखारे, निवृत्ती पळसकर,मनीषा राऊत, शंकर तांबे, आदी उपस्थित होते.
