दिवाळी निमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पारनेर तालुक्यातील पत्रकारांना मिठाई व भेटवस्तूंचे वाटप!
दिवाळी निमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पारनेर तालुक्यातील पत्रकारांना मिठाई व भेटवस्तूंचे वाटप!
संघटनेचे कार्य महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश, गोवा, गुजरात व इतर राज्यात सुरू असून २७ हजारांपेक्षा जास्त सभासद असलेली ही एकमेव पत्रकारांची संघटना .
पारनेर प्रतिनिधी :- ( सुदाम दरेकर )
महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक सभासद संख्या असलेली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना नेहमीच सामाजिक उपक्रम राबवित असते , त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंढे यांच्या संकल्पनेतून दिवाळीनिमित्त संघटनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या शुभहस्ते व नगर जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात पारनेर तालुक्यातील पत्रकारांना दिवाळी सणानिमित्त मिठाई व भेटवस्तूचे वाटप करुन पत्रकारांची दिवाळी गोड केली
यावेळी नुकत्याच संपन्न झालेल्या दिक्षाभुमी ते मंत्रालय ” पत्रकार संवाद यात्रे ” च्या पुस्तिकेचे प्रकाशन व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे संपादक असलेल्या ” समर्थ गांवकरी ” या वृत्तपत्राचे अनावरण करण्यात आले.
या प्रसंगी डॉ आरोटे यांनी बोलताना म्हणाले की, सरकारी व्यवस्था कोणत्याही घटकाला न्याय देताना मतांच्या गाठ्याचा विचार करत असेल , तर पत्रकार हा देखील एक मतांचा गठ्ठा असुन त्यांच्या मागण्याकडे देखील शासनाने लक्ष द्यायला हवे , प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांच्या अथवा पक्षांच्या भूमिका व विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार व वृत्तपत्र ही माध्यमे अत्यंत आवश्यक असतात . मात्र निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधी या माध्यमांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असतो , त्यामुळे पत्रकारांच्या अनेक मागण्या वर्षानुवर्ष तशाच प्रलंबित आहेत या सर्व बाबींचा विचार करत राज्य संघाचे मार्गदर्शक संजयराव भोकरे , प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे कार्य महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश, गोवा, गुजरात व इतर राज्यांत सुरू असून २७ हजारा पेक्षा जास्त सभासद असलेली देशातील पत्रकारांचे एकमेव संघटना असून संघटनेच्या वतीने नुकतीच लोकशाहीच्या बळकटीसाठी, पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी वेगवेगळ्या मागण्यांच्या संदर्भात प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी पत्रकार संवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती . या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शासनाने देखील यांची त्वरित दखल घेत पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना केली , हे नक्कीच आपले यश असून आगामी काळात देखील संघटना पत्रकारांच्या हितासाठी असलेल्या इतर सर्व मागण्या शासनाकडून पूर्ण करून घेणार असल्याचे सांगत. या विधानसभा निवडणुकीत उभ्या असलेल्या प्रत्येक उमेदवाराने आपल्या जाहीरनाम्यात पत्रकारांच्या मागणीचा उल्लेख करुन त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहिला , तर पत्रकार सदैव त्यांच्या सोबत राहील असे मत डॉ आरोटे यांनी व्यक्त करत उपस्थित सर्व पत्रकारांना व त्यांच्या परिवाराला मिठाई व भेटवस्तु देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे नगर जिल्हा सरचिटणीस सुरेश खोसे पाटील , मार्गदर्शक रामचंद्र सुपेकर सर , तालुका उपाध्यक्ष ठकसेन गायखे , सहसचिव ॲड . सोमनाथ गोपाळे, कार्यकारिणी सदस्य दिपकराव वरखडे , प्रविण वराळ , सलीम भाई हवालदार , संजयराव मोरे , यांच्या सह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड . सोमनाथ गोपाळे व दिपक राव वरखडे यांनी केले , तर प्रास्ताविक रामचंद्र सुपेकर सर यांनी केले. उपाध्यक्ष ठकसेन गायखे यांनी आभार मानले .
