म्हारळ, वरप, कांबा या गावातील विकास कामेच उल्हासनगर विधानसभा निवडणुकीत कुमार आयलानी यांना तारणार!
म्हारळ, वरप, कांबा या गावातील विकास कामेच उल्हासनगर विधानसभा निवडणुकीत कुमार आयलानी यांना तारणार!
प्रतिनिधी कल्याण – ( संजय कांबळे ) –
कल्याण तालुक्यातील आणि उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात समावेश असलेल्या म्हारळ, वरप, कांबा या गावात केलेली लाखो रुपयांची विविध विकास कामेच अंत्यत अडचणींच्या काळात महायुतीचे उमेदवार कुमार आयलानी यांना तारणार आहेत, तसा विश्वास पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
उल्हासनगर विधानसभा निवडणुकीत भाजपाचे विद्यमान आमदार कुमार आयलानी यांना महायुतीने पुन्हा उमेदवारी दिली आहे. जनमानसात मिसळणारा,मितभाषी, कोणालाही आपलासा वाटणारा आमदार अशी ओळख कुमार आयलानी यांची आहे. अशातच या मतदारसंघात समावेश असलेल्या एकमेव मराठी गावे म्हारळ, वरप, कांबा, या गावातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे कुमार आयलानी यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित असलेले मराळेश्वर शिवमंदिर याला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करून त्याच्या जिर्णोद्धाराचे प्रयत्न सुरू केले, गावात अंतर्गत रस्ते, गटारे सिंमेट काँक्रीटीकरण केले, परिसरातील नागरिकांना लाईट बील भरणे व तक्रार करण्यासाठी टिटवाळा येथे जावे लागत होते, हे लक्षात येताच, ही सोय रिजन्सी येथे केली, उल्हास नदीच्या काठावर विसर्जन घाटाकरीता लाखोंचा निधी मंजूर केला.
वरप येथील गावदेवी मंदिराचा मुख्य रस्ता स्मशानभूमी सुशोभीकरण निधी तर कांबा ग्रामपंचायत हद्दीतील तलाव सुशोभीकरण, पाचवा मंदिर परिसर सुशोभीकरण, पठारपाडा, नाणेपाडा रस्ता, आदी शेकडो विकास कामे या परिसरात करण्यात आली काही सुरू आहेत. केवळ म्हारळ, वरप, कांबा या परिसरातील सुमारे१४ते१५हजार महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळवून दिला,
त्यामुळे सध्या काही विघ्णसंतोषी लोकामुळे कुमार आयलानी यांना अडचणी निर्माण करण्यात येत असल्या तरी त्यांनी या भागात केलेली विकास कामे बघूनच त्यांना पुन्हा मतदार सेवा करण्याची संधी देतील अशी परिस्थिती या गावात दिसून येत आहे.
