“ज्यांना गद्दार बोलतात ते मुख्यमंत्री होतात, उल्हासनगर भाजपा जिल्हाध्यक्षांचे वादग्रस्त विधान, मंत्री रवींद्र चव्हाण यांची दिलगिरी!
“ज्यांना गद्दार बोलतात ते मुख्यमंत्री होतात, उल्हासनगर भाजपा जिल्हाध्यक्षांचे वादग्रस्त विधान, मंत्री रवींद्र चव्हाण यांची दिलगिरी!
कल्याण प्रतिनीधी (संजय कांबळे)-
उल्हासनगरच्या राजकीय रंगमंचावर .शनिवारी उल्हासनगर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी एका कार्यक्रमात बोलताना “ज्यांना गद्दार बोलतात ते मुख्यमंत्री होतात”असे खळबळजनक विधान केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.या विधानाने शिवसेना आक्रमक झाली असून रामचंदानी यांनी माफी मागितली नाही तर महायुतीचे उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचारात सहभागी होणार नाही असा पवित्रा घेतला आहे.त्यामुळे ऐन दिवाळीत भाजपा आणि शिवसेना(शिंदे गट)याच्यात राजकीय फटाके फुटू लागले आहे. याचा परिणाम मात्र येथील उमेदवार कुमार आयलानी यांच्या वर होणार असे दिसते.
भाजपा उमेदवार कुमार आयलानी यांना साई पक्षाने पाठिंबा दिल्यानंतर आयोजित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मेळावा कार्यक्रमात प्रदीप रामचंदानी यांनी हे वादग्रस्त विधान केले.रामचंदानी यांनी आपल्या भाषणात ज्यांना गद्दार बोलतात ते मुख्यमंत्री होतात”आता ही राजकारणाची नवीन परिभाषा असल्याचे ते म्हणाले.या विधानाने शिवसेनेचा पारा चढला आहे.जोपर्यंत रामचंदानी माफी मागत नाहीत, तोपर्यंत शिवसेनेचा एकही कार्यकर्ता भाजपा उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचारात काम करणार नाही, अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे.
तसे पाहिले तर अडिज वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी ४०आमदार घेऊन सुरत गुहाहटी येथे पलायन केल्यानंतर शिवसेना(उबाठा)तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी त्यांच्या वर ‘गद्दार,अशी जहरी टिका केली, ऐवढयावरच न थांबता,५०खोके, एकदम ओके, या घोषणेने तर महाराष्ट्र ढवळून निघाला, शिंदे गटाचे मंत्री, आमदार राज्यात जेथे जात तेथे त्यांना ५०खोके, एकदम ओके, याचा’सामना, करावा लागत होता, याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत देखील झाला, त्यामुळे शिवसेना(शिंदे)गटाची मोठ्या प्रमाणात बदनामी होत होती,
राज्यात भाजपा, शिवसेना(शिंदेगट)आणि राष्ट्रवादी(ऐपी गट)यांचे महायुतीचे सरकार होते, परंतु यांच्यात या ना त्या कारणांमुळे नेहमी खटके उडत होते. उल्हासनगर मध्ये याचे प्रमाण जरा जास्तच होते. अशातच भाजपाचे उमेदवार कुमार आयलानी यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते मेळाव्याचे आयोजन उल्हासनगरात केले होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी, ज्यांना गद्दार, म्हणून बोलतात, ते मुख्यमंत्री होतात, आता ही नवीन राजकारणाची परिभाषा झाली असल्याचे त्यांनी विधान केले, त्यामुळे शिवसेना(शिंदेगट)आक्रमक झाली, मंत्री रवींद्र चव्हाण यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. तसे पाहिले तर उल्हासनगरात भाजप आणि शिवसेना(शिंदेगट)यांच्यात सर्व काही अलबेल आहे असे मुळीच नाही, त्यामुळे जे पोटात होते तेच ओटी आले इतकेच! आता याचा परिणाम काय व किती होतो हे लवकर कळेल.
