माठ येथील तंटामुक्तीचे मा.अध्यक्ष अहिलाजी देविकर यांचे निधन.
माठ येथील तंटामुक्तीचे मा.अध्यक्ष अहिलाजी देविकर यांचे निधन.
श्रीगोंदा प्रतिनिधी – ( अमोल बोरगे )
माठ येथील तंटामुक्तीचे मा.अध्यक्ष कै.अहिलाजी पाराजी देविकर यांचे प्रदिर्घ आजाराने चिंचवड,पुणे येथे निवासस्थानी निधन झाले.माठ येथील तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष कै.अहिलाजी देविकर हे माठ ग्रामपंचायतीचे मा.सदस्य होते.आरोग्य विषयक जनजागृती करण्यासाठी त्यांनी अनेकांना व्यायामाचे महत्त्व पटवून दिले.त्यांचा अपघातात पुर्वी पाय मोडला तरीसुद्धा ते शीर्षासन करत होते, तसेच उत्तम आरोग्यासाठी प्राणायामाचा ,व्यायामाचा आग्रह धरीत होते.स्वता:आजारी पडूनही त्यांचा व्यायामात तसेच व्रुत्तपत्र वाचनात खंड नव्हता.
आरोग्यविषयक जनजागृती संदर्भात कै.अहिलाजी देविकर यांनी पतंजलिचे अनेक शिबिरात सहभाग घेतला होता.पद्मश्री आण्णा हजारे यांनीही अहिलाजी देविकरांना सन्मानित केले होते.
त्यांच्या मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री.जगन्नाथ देविकर आणि लष्करातील सेवानिवृत्त अधिकारी ले.कर्नल पंढरीनाथ देविकर हे मुलगे आहे.श्रीगोंदा येथील सौ.जयश्री हराळ ,मुलगी तसेच सुना,नात,नातू, जावई असा परिवार आहे.
माठ येथे अंत्यसंस्कारासाठी समाजातील मान्यवर , नातेवाईक, जनसमुदाय उपस्थित होता.
,कै.अहिलाजी देविकर यांच्या निधनामुळे माठ, राजापूर परिसरातील एक जाग्रुत नागरिक, शिक्षण व आरोग्यप्रेमी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना असून समाजातील सर्व स्तरांवर हळहळ व्यक्त होत आहे.
