येवती विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री.अनिल दिवटे यांची बिनविरोध निवड
येवती विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री.अनिल दिवटे यांची बिनविरोध निवड
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
श्रीगोंदा तालुक्यातील येवती येथील संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये अनिल रतन दिवटे यांचा एकमेव अर्ज चेअरमन पदासाठी अर्ज दाखल झाला त्यामुळे अनिल दिवटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.अनिल दिवटे यांच्या अर्जावर सूचक म्हणून श्री.बलभीम आढाव यांनी स्वाक्षरी केली तर अनुमोदक म्हणून संदीप भाऊसाहेब दिवटे यांनी स्वाक्षरी केली.मा.सरपंच विलास आण्णा दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.यावेळी मावळते चेअरमन गुलाब आण्णा दिवटे ,व्हॉइस चेअरमन अमोल गायकवाड,संचालक बलभीम आढाव,संदीप भाऊसाहेब दिवटे,किसन बाबाजी ताम्हाणे ,ताराबाई विष्णू ठोंबरे,सीताबाई कारभारी आढाव,सुनील केरू जाधव, अनिल दिवटे या सर्व 9 संचालकांनी अनिल रतन दिवटे यांची बिनविरोध निवड करण्यासाठी मेहनत घेतल.
यावेळी आबा जाधव,चांगदेव ठोंबरे,संदीप म्हस्के ,आदी उपस्थित होते.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीम.भवर मॅडम यांनी काम पाहिले,तर त्यांना सोसायटी सचिव दिवटे भाऊसाहेब व प्रवीण गायकवाड यांनी सहकार्य केले.
सदर निवड झाल्यानंतर सर्वांनी चेअरमन अनिल दिवटे यांना शुभेच्छा दिल्या.
