राजकीय

श्रीगोंदा नगर विधानसभा मतदार संघातून विक्रम पाचपुते यांचीच उमेदवारी जाहीर करून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

श्रीगोंदा नगर विधानसभा मतदार संघातून विक्रम पाचपुते यांचीच उमेदवारी जाहीर करून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

श्रीगोंदा प्रतिनिधी : ( मुख्यसंपादक – अमोल बोरगे )

श्रीगोंदा नगर विधानसभा मतदार संघातून माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना भाजपाची उमेदवारी जाहीर झाली असली तरी श्रीगोंद्यातून विक्रम पाचपुते यांचीच उमेदवारी जाहीर करून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरावे,अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
आमदार बबनराव पाचपुते यांच्या प्रकृतीमुळे त्यांच्या पत्नी डॉ.प्रतिभा पाचपुते यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार उमेदवारी अर्जही दाखल करण्यात आला आहे.परंतु आमदार पाचपुते यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता प्रतिभा पाचपुते यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाचपुते यांनीही पक्षाच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचपुते यांच्या श्रीगोंदा येथील माऊली संपर्क कार्यालयात आ.पाचपुते यांची मतदार संघातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भेट घेऊन उमेदवारी बदलाबाबत चर्चा केली.
यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी आ.पाचपुते यांच्या पत्नी डॉ.प्रतिभा पाचपुते यांच्या मागणीचा व भावनेचा विचार करून त्यांच्या ऐवजी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाचपुते हेच भाजपाचे उमेदवार पाहिजेत असा एकमुखी सुर काढला.आमदार बबनराव पाचपुते हाच आमचा पक्ष व आ.पाचपुते सांगतील तोच उमेदवार अशा भावना व्यक्त करून आ.पाचपुते देतील तो उमेदवार आम्ही निवडून आणणार असे पोपटराव खेतमाळीस, गणपतराव काकडे, बाळासाहेब महाडीक, प्रताप पाचपुते,माऊली हिरवे, मारुती औटी, बाबासाहेब काळे, सुभाष निमसे, संतोष भापकर,नानासाहेब कोथंबिरे,पुरुषोत्तम लगड, मिलिंद दरेकर तसेच प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय कार्यकर्त्यांनी चर्चेदरम्यान विक्रम पाचपुते यांचीच उमेदवारी द्या अशी आग्रही मागणी केली.
त्यामुळे आता विक्रम पाचपुते यांची उमेदवारी राहणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी कार्यकर्त्यांच्या भावना पक्षाच्या वरिष्ठांना कळवू व निर्णय घेऊ असे सांगितले.
प्रास्ताविकात तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी डॉ.प्रतिभा पाचपुते व विक्रम पाचपुते यांच्या उमेदवारी बाबत भावना व्यक्त केल्या.

विक्रमसिंह यांची उमेदवारी सक्षम ठरणार….

भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाचपुते यांना तरुण वर्गाचा प्रतिसाद चांगलाच वाढला आहे.आमदार पाचपुते यांच्या आजारपणामुळे तालुक्यातील विकासकामांसाठी मंत्रालयात जाऊन निधी मिळवण्याची हातोटी विक्रम यांच्याकडे आहे.तसेच जुन्या नव्या कार्यकर्त्यांची सांगड घालण्यात विक्रम पाचपुते यांना चांगला अनुभव आहे.या सर्व बाबींमुळे विक्रम पाचपुते यांची उमेदवारी सक्षम ठरणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!