निवास नाईक यांची उमेदवारी श्रीगोंदा तालुक्यातील राजकारणाला वेगळ्या दिशेला घेऊन जाणार ! मनोज जरांगे पाटलांच्या आदेशाने उमेदवारी फॉर्म भरला आहे – निवास नाईक
निवास नाईक यांची उमेदवारी श्रीगोंदा तालुक्यातील राजकारणाला वेगळ्या दिशेला घेऊन जाणार !
मनोज जरांगे पाटलांच्या आदेशाने उमेदवारी फॉर्म भरला आहे – निवास नाईक
श्रीगोंदा :- (मुख्यसंपादक – अमोल बोरगे )
राज्य राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटना चे माजी उपाध्यक्ष निवास नाईक यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडी कडून ते इच्छुक होते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे येथे घेतलेल्या मुलाखती मध्ये त्यांनी मुलाखत दिली होती जागा वाटपात शिवसेनेला जागा सुटल्याने नाईक यांनी २४ ऑक्टोंबर रोजी मराठा आरक्षण लढाई चे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली होती जरांगे पाटील यांनी निवास नाईक यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले त्यानुसार नाईक यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी सिने अभिनेते विजय नवले,चांभुर्डी येथील चेअरमन बाबुराव ढगे , दानेश सय्यद,जितेंद्र पाडळे,मा.सरपंच संपत उदार उपसरपंच संतोष ढगे, बन्सी आढाव, श्रीधर नाईक,जयसिंग वाळके सर संकेत ढगे दत्तात्रय नाईक आदी उपस्थित होते.
मतदार संघात ग्रामीण भागात विकासाचा अनुशेष भरून काढणे साठी एमआयडीसी , साकळाई योजना, डिंबे माणिक डोह बोगदा, विसापुर तलाव शेजारील व खालील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करुण न्याय देणे,ग्रामीण रुग्णालय इत्यादी तालुक्यातील मूलभूत गरजांसाठी आपण निवडणूक लढवणार असल्याचे नाईक यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
कोण आहेत निवास नाईक ?
निवास नाईक हे श्रीगोंदा तालुक्यातील जांभुर्डी गावचे भूमिपुत्र आहेत. अनेक वर्षांपासून ते माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे मंत्रालयातील अत्यंत विश्वासू २०१४ पर्यंत चे स्वीससहाय्य ( PA ) होते .परंतु माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी २०१४ नंतर राष्ट्रवादी पक्षामधून भारतीय जनता पार्टी ( BJP ) मध्ये प्रवेश केल्यामुळे निवास पाटील हे राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहून २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये माजी आमदार राहुल जगताप यांना निवडून आणण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. अनेक वर्ष मंत्रालयात प्रशासनामध्ये काम करण्याचा त्यांचा मोठा अनुभव आहे .
