राजकीय

श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघात विक्रमसिंह चा नवा विक्रम तब्बल 36894 मतांनी विजयी

श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघात विक्रमसिंह चा नवा विक्रम तब्बल 36894 मतांनी विजयी

श्रीगोंदा प्रतिनिधी -प्रा.केशव कातोरे ( विशेष कार्यकारी संपादक )

श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी पक्षाचे अधिकृत उमेदवार विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांनी तब्बल 98931 एवढी प्रचंड मते घेत आजपर्यंत या मतदारसंघात सगळ्यात जास्त म्हणजे तब्बल 36894 एवढ्या फरकाने ही निवडणुक जिंकत श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघात विक्रम यांनी नवीन विक्रम केला.विक्रम पाचपुते यांनी कुठल्याही सेवा संस्था किंवा इतर कोणत्याही प्रकारची निवडणूक आतापर्यंत लढवली नव्हती या मतदार संघाचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या आशीर्वादाने व कार्यकर्ते च्या आग्रहाखातर विक्रम पाचपुते यांनी थेट विधानसभा निवडणुक लढवायची ठरवली व सुरवातीपासुन या मतदारसंघात भारतीय जनता पार्टी चे विक्रम पाचपुते, शिवसेना उबाटा गटांच्या अनुराधा नागवडे,अपक्ष उमेदवार राहुल जगताप व वंचित बहुजन आघाडीचे आण्णासाहेब शेलार यांच्यात अटीतटीचा सामना रंगला होता,या मतदारसंघात अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांच्या उमेदवारीने रंगत आली होती, प्रत्येक उमेदवाराने ही निवडणुक प्रतिष्ठेची करत जोरदार तयारी केली होती.त्यामुळे या निवडणुकीत कोण विजयी होणार यांचा अंदाज कोणालाच येत नव्हता परंतु विक्रमसिंह पाचपुते यांनी पहिल्यांच निवडणुकीत आपला करीश्मा दाखवत विजय तोही विक्रमी मतांनी संपादन केला यामध्ये महायुतीची ध्येयधोरणे, आजपर्यंत विद्यमान आमदार,माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी या मतदारसंघात केलेली विकासकामे व त्याचबरोबर हक्काचे जोडलेले कार्यकर्ते व मतदार, तसेच या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य मातोश्री प्रतिभाताई पाचपुते, परीक्रमा शैक्षणिक संकुलाचे सर्वेसर्वा प्रतापसिंह पाचपुते ,महायुतीचे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टी चे श्रीगोंदा तालुक्यातील पदाधिकारी यांच्या झंझावाता प्रचार दौरा , योग्य नियोजन तसेच विक्रमसिंह पाचपुते यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणातुन हा विजय सुकर झाल्याचे बोलले जात आहे.विक्रमसिंह पाचपुते मतमोजणीच्या सुरवातीपासुनच आघाडीवर होते प्रत्येक फेरीगणीत त्यांची आघाडी वाढत गेली व अटीतटीची वाटणारी निवडणुक अगदी एकतर्फी झाली, विक्रम पाचपुते विजयी होताच मतदार संघातील प्रत्येक गावागावात व विशेषता श्रीगोंदा शहरात फटाके वाजवत, ढोल ताश्याच्या आवाजात आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

बबनराव पाचपुते यांच्या भाषणाने करीश्मा केला –

 या निवडणुकीत श्रीगोंदा तालुक्यातील दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेते पाचपुते यांच्या व्यासपीठावर आले नाहीत, कुटुंबातील काही नी टोकांचा विरोध केला,पक्षाकडुन बळ मिळाले परंतु पक्षांच्या कोणत्याही बड्या नेत्यांनी या मतदारसंघात जाहिर प्रचार सभा घेतली गेली नाही म्हणून शेवटच्या टप्प्यावर ही निवडणुक पाचपुते कुटुंबाच्या हातुन जाते की काय अशी अवस्था झाली होती,परंतु ज्या काष्टी च्या चौकातुन आदरणीय बबनराव पाचपुते यांनी आपल्या राजकीय कारकीर्द ला सुरुवात केली त्यांच काष्टी च्या भैरवनाथ चौकात आमदार म्हणून माझं शेवटचं भाषण ऐकायला या अशी भावनिक साद आदरणीय बबनराव पाचपुते यांनी घातली व गावागातुन आलेल्या मतदारला या मतदारसंघाच्या विकासासाठी विक्रमसिंह ला वीजयी करण्याचे आव्हान केले, आजारपणामुळे या निवडणुकीत केलेले हे पहिले व शेवटचे भाषण मतदाराना भावले व वातावरण फीरले.पुन्हा एकदा या वयांत आजारपणातही आदरणीय बबनराव पाचपुते यांच्या भाषणाने करीश्मा केल्याचे बोलले जात आहे.

जगताप , नागवडे , शेलार यांनी अस्तित्व अधोरेखित केले –

 अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांनी 62037 एवढे मतदान घेत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे तसेच महाविकास आघाडीच्या उबाटा गटांच्या अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदेच्या माजी सभापती अनुराधा नागवडे यांनी 53096 मते घेत हा मतदारसंघ संघ पिंजुन काढुन एक निष्ठावंत कार्यकर्ते व शिवसैनिक यांची फळी तयार केली भविष्यात त्या आपल्या कामकाजाचा ठसा उमठवणार यांत शंका नाहीं तसेच वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांनी 27509 एवढी मत घेत आपले अस्तित्व अधोरेखित केले आहे.या सगळ्या बाबींचा विचार करुन भविष्यातील या मतदारसंघातील राजकारण साधलं जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!