रस्त्याचे काम चालू असताना रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे मोठ्या खड्यात गेली गाडी , उक्कडगाव मध्ये घडली दुर्घटना
रस्त्याचे काम चालू असताना रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे मोठ्या खड्यात गेली गाडी ,
उक्कडगाव मध्ये घडली दुर्घटना
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
गव्हाणवाडी फाटा ते श्रीगोंदा या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात दिशादर्शक फलक नसल्याने तसेच रस्त्यावर प्रवाशांच्या सुरक्षेबाबत उपाय योजना केलेल्या नसल्याने रस्त्याच्या कामात प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत असून याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे.ठेकदाराच्या हलगर्जीपणामुळे धोकादायक
रस्त्यामुळे वाहनचालकाना नेहमी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. उक्कडगाव येथे कुकडी कॉलनीच्या जवळ फुल तयार करण्यासाठी खड्डा करून अनेक दिवस तसाच करून ठेवला होता परंतु त्या ठिकाणी प्रत्यक्षात कोणतेच काम चालू नव्हते सुरक्षेसाठी उपाययोजनाही केल्या नव्हत्या व त्या ठिकाणी क्रेटा कंपनीची नंबर प्लेट नसलेली गाडी त्यामध्ये पलटी झाली या अपघातामध्ये गाडीचे पूर्णपणे नुकसान झाले असून ड्रायव्हर जखमी झाल्याचे समजत आहे.अपघात झाल्यानंतर पुलासाठी करण्यात आलेला तो खड्डा पुन्हा बुजून टाकला आहे त्यामुळे ठेकेदार इंजिनिअर तसेच ठेकेदारांनी नेमून दिलेले सब ठेकेदार यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी ढवळगाव येथील वाळुंज मळा येथे एक गाडी श्रीगोंदा रोडने शिरूर च्या दिशेने जाताना अरुंद पुलावरून गाडी खाली गेली होती. परंतु अशा दुर्घटना व अपघात याकडे स्थानिक पदाधिकारी आणि एम.एस. आय.डी.सी ने लक्ष देण्याची गरज आहे.
