लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांचे श्रीगोंदा मध्ये स्वागत आमदार विक्रमसिंह पाचपुते यांना पुणे येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण
लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांचे श्रीगोंदा मध्ये स्वागत
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांना पुणे येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
दिनांक १५ फेब्रुवारी रोजी लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष मा. कैलासदादा खंदारे यांच्या श्रीगोंदा दौऱ्यानिमित्त त्यांचे तालुका व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी उत्साहात स्वागत केले. हा दौरा १ मार्च रोजी पुणे येथे होणाऱ्या लहुजी शक्ती सेनेच्या महाअधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित करण्यात आला होता.
या वेळी राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर जगधने,अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुनीलभाऊ शिंदे, संजय वाल्हेकर, युवक जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब रोकडे, जिल्हा महासचिव किरण उमाप, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष नवनाथ शिंदे, उपाध्यक्ष दत्ताभाऊ शिंदे, युवक तालुकाध्यक्ष रामभाऊ मोरे, विधानसभा अध्यक्ष संदीप अवचिते, श्रीगोंदा शहराध्यक्ष हर्ष आढागळे ,वसंत अवचिते, गणेश लोंढे, प्रवीणकुमार शेंडगे, दादाभाऊ सकट, मोहन सकट, बाबासाहेब बुलाखे,संतोष शेंडगे, तसेच अनेक कार्यकर्ते आणि समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी महाअधिवेशनाच्या आयोजनासाठीची तयारी आणि नियोजनाबाबत सविस्तर चर्चा झाली. कैलासदादांनी कार्यकर्त्यांना अधिवेशन यशस्वी करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्यासाठीचे मार्गदर्शन केले.तसेच श्रीगोंदा तालुका विद्यमान आमदार मा.विक्रमसिंह दादा पाचपुते यांना ही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले असता त्यांनीही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या..
