ढवळगाव खंडेश्वर यात्रा उत्साहात पार . ऑर्केस्ट्रा मधून शाहीर शैलेश लोखंडे यांनी दिला स्त्रीभून हत्या थांबवण्याचा संदेश !!
ढवळगाव खंडेश्वर यात्रा उत्साहात पार .
ऑर्केस्ट्रा मधून शाहीर शैलेश लोखंडे यांनी दिला स्त्रीभून हत्या थांबवण्याचा संदेश !!
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील खंडेश्वर देवाची यात्रा १३ फेब्रुवारी व १४ फेब्रुवारी रोजीमोठ्या उत्साहात पार पडली यावेळी जेजुरी गडावरून ज्योत घेऊन गावामध्ये मिरवणूक यात्रेच्या दिवशी देवाचे मानाचे गाडे ( रथ ) ओढण्याचा कार्यक्रम पार पडला देवाचा नंगर ओढणे देवाचा छबिना पुजा – आरती असा सर्व पारंपरिक पद्धतीने यात्रा पार पडली .यात्रेच्या दिवशी कै.तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे यांचा लोकनाट्य तमाशा पार पाडला तसेच दुसऱ्या दिवशी दुपारी शंभर रुपयापासून ते दहा हजार रुपये पर्यंत निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा पार पडला.विजयी पैलवानांना मानाची सन्मान ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला तसेच संध्याकाळी लावण्यचंद्रा निर्मिती शाहीर शैलेश लोखंडे यांचा मराठी हिंदी गाणे व लावण्यांचा तसेच स्त्रीभुन हत्या थांबवा असा संदेश देणारा समाज प्रबोधन सदाबहार ऑर्केस्ट्रा पार पडला .यावेळी गावातील ग्रामस्थ व तरुण मंडळ तसेच यात्रा कमिटीने यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले .
तमाशा व ऑर्केस्ट्रा मधुन सामाजिक प्रबोधन
कै.तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे यांचा लोकनाट्य तमाशा कलावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांचे गळा भेट या पात्रामधून प्रेक्षकांचे मने जिंकले तसेच ऑर्केस्ट्रा लावण्यचंद्रा निर्मिती शाहीर शैलेश लोखंडे यांनी घराघरात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी प्रथम जिजाऊ माता जन्माला आल्या पाहिजे त्यासाठी समाजाने पोटात लेकीची स्त्रीभुन हत्या थांबवावी असा अंगावर शहारे येणारा पोवडा गायला त्यामुळे महिला मधुन कार्यक्रमाचे तोंड भरून कौतुक झाले .
