देवदैठण येथील सौर ऊर्जा प्रकल्पाला लागली आग , रस्त्या अभावी अग्निशामक दलाच्या गाड्या आग न विजवता गेल्या मागे !
देवदैठण येथील सौर ऊर्जा प्रकल्पाला लागली आग , रस्त्या अभावी अग्निशामक दलाच्या गाड्या आग न विजवता गेल्या मागे !
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
श्रीगोंदा तालुक्यातील श्री.क्षेत्र देवदैठण येथील काही वर्षांपूर्वी ५२ एकरामध्ये चालू झालेल्या हजारो कोटी खर्च करून मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी योजने ला पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास केबल पार्किंग झाल्यामुळे त्यामधील उडणाऱ्या ठीणग्यांनी गवत पेटले व त्या परिसरातील केबल तसेच इतर साहित्य आगी मध्ये भस्म झाले त्या मुळे त्या ठिकाणचे अंदाचे पंधरा ते विस लाखांचे नुकसान झाले आशी माहिती तेथील सौर ऊर्जा प्रकल्प सिनीयर इंजिनेर सागर मिश्रा यांच्या कडून सांगण्यात आले. अतुल गायकवाड यांनी सर्व प्रथम आग लागलेली पाहिली त्यांनी सुरक्षा रक्षक यांना माहिती दिली. आग विजवण्यासाठी अतुल गायकवाड, राजेंद्र गायकवाड, किरण गायकवाड, कैलास ढवळे, ओंकार गायकवाड, प्रमोद बनकर, अक्षय बनकर, केतन ढवळे, सुनील गायकवाड,भगवान वधवे व अदानी कंपनीचे कामगार यांनी मदत केली अग्नीशामक दलाला ओमकार रायकर निलेश गायकवाड अमोल कौठाळे यांनी आमदार विक्रम पाचपुते व दादाभाऊ वाखारे यांच्या मार्फत संपर्क केला अग्निशामक दलाला फोन लावला व दोन गाड्या अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले परंतु प्रकल्पाकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याकारणाने अग्निशामक दल आग विजवण्यासाठी घटनास्थळापर्यंत जाऊ शकले नाही . वेळेतच आग आटोक्यात आणली त्यामुळे सौर प्लेट पर्यंत ही आग पोहोचली नाही या प्रसंग सावधनेमुळे व त्यांच्या मेहनतीमुळे ५२ एकर मधील मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी प्रकल्प आगीत भस्मसात होण्या पासुन वाचला आसे प्रत्यक्षदर्शी यांच्या कडुन सांगण्यात आले आहे . सदरील प्रकल्पावरती आदानी कंपनी चे इनर्जी इपेसेंसी सर्वीस प्रायव्हेट लिमिटेड (EECL) व महावितरण चे नियंत्रण आहे.
सदरील प्रकल्प शासणाच्या अटी शर्ती यांचे पालन न करता उभा राहिला आहे असा आरोप काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते सतीश वाघमारे यांनी माहितीच्या अधिकाराच्या माहिती अंतर्गत ग्रामस्थांच्या लक्षात आणुन दिला होता या प्रकल्पाला जाण्यासाठी रस्त्या नाही झाडे,गावाला व शेतीसाठी चौविस तास लाईट वितरण इत्यादी साठी खुलासा साठी सतिष वाघमारे यांनी ऊपोषण केले होते परंतु त्यावरती कोणतीच कारवाई झाली नाही असे वाघमारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले .
