राजापूर येथे श्री संत गोविंदबाबा यांच्या पादुकांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न..
राजापूर येथे श्री संत गोविंदबाबा यांच्या पादुकांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न..
प्रतिनिधी – अमोल बोरगे
श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर नंबर १ येथे श्री संत गोविंद बाबा यांची संजीवन समाधी आहे,मागील दीड महिन्यांपूर्वी बाबांच्या मंदिरातून पादुकांची चोरी झाली होती परंतु त्या पादुकांचा एक महिना उलटूनही बेलवंडी पोलिसांना शोध न लागल्या कारणाने ग्रामस्थांनी लोक वर्गणी तून पुन्हा पादुकांचे नव्याने प्रतिष्ठापना करण्याचे ठरवले,राजापूर ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाविकांनी आर्थिक योगदान दिल्याने पुन्हा नव्याने पादुकांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा ह.भ.प गुरुवर्य वेताळ गुरुजी यांच्या मार्गदर्शना खाली आज संपन्न झाला..
सोहळ्यात ब्रम्हमूर्ती माधव महाराज इंगोले देवाची आळंदी यांचे हरिकीर्तनाची सेवा झाली..
कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते,या सोहळ्यासाठी माजी जि.प.सदस्य गणेश ढवळे,मा.सरपंच संतोष शिंदे,मा.चेअरमन विजय खरबस,मा.उपसरपंच अनिल गव्हाणे,मा.उपसरपंच सचिन चौधरी,मा.उपसरपंच कांतीलाल गव्हाणे,मा.सदस्य राजेंद्र बबन ढवळे,मा.उपसरपंच अशोक ईश्वरे गुरुजी,मा.सदस्य गोरख पोटावळे,मा पोलिस पाटील पांडुरंग व्यवहारे,मेजर तात्याभाऊ व्यवहारे,प्रभाकर दीक्षित,मेजर सुनील व्यवहारे,नामदेव व्यवहारे,भरत व्यवहारे,भाऊसाहेब रणदिवे,प्रकाश रणदिवे,विजय माने,रोहिदास रणदिवे,हरिभाऊ जगताप,मनोज जगताप,बाबूराव ढवळे,नरेंद्र ढवळे,रामभाऊ अढाव,मेजर सुनील ढवळे,मेजर संभाजी थेऊरकर,राघू ढवळे,विनायक ढवळे,संपत दगडू ढवळे,संभाजी वीर,चिमाजी खरबस,उमेश पोटघन,कुमोद रणदिवे,नितीन रणदिवे,माऊली पाचरणे,सूरज खरबस,सोन्याबापू ढवळे,संजय बोरहाडे,नवनाथ पवार यांच्यासह राजापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिती होती .
