गौरी शुगर जिल्ह्यात सर्वाधिक बाजारभाव देणार -बाबुराव बोत्रे पाटील मोफत साखर वाटप; शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण
गौरी शुगर जिल्ह्यात सर्वाधिक बाजारभाव देणार -बाबुराव बोत्रे पाटील
मोफत साखर वाटप; शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण
श्रीगोंदा प्रतिनिधी –
शेतकऱ्यांच्या उसाला योग्य बाजारभाव दिला गेला पाहिजे कारण कारखाना चालवताना
सर्वसामान्य शेतकरी केंद्रबिंदू मानून आपण काम करत आहे. ऊस उत्पादक शेतकरी बारा महिने ऊसाच्या पिकाला जपत असतो म्हणून त्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी आपण टनाप्रमाणे साखर मोफत देत आहोत महाराष्ट्रात नऊ साखर कारखान्याच्या माध्यमातून ओंकार ग्रुप काम करत आहे कारखान्याच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गाला मोफत साखर वाटप करण्याचा उपक्रम राबवत आहोत या वर्षी गौरी शुगरच्या माध्यमातून हा उपक्रम राबवत असल्याचे बाबुराव बोत्रे यांनी सांगितले
यावर्षी गौरी शुगर व देवदैठण कारखान्याच्या माध्यमातून दहा लाख टनाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि जिल्ह्यात सर्वाधिक बाजारभाव आपला कारखाना देईल असे हिरडगाव येथील गौरी शुगर कारखान्या मध्ये शेतकरी वर्गाला साखर वाटप कार्यक्रमाप्रसंगी बाबुराव बोत्रे पाटील यांनी सांगितले या वेळी हिरडगाव ग्रामस्थ्यांच्या वतीने बोत्रे यांचा सत्कार करण्यात आला.
