शेलार यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर श्रीगोंद्यात !
शेलार यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर श्रीगोंद्यात !
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे ( मुख्यसंपादक )
:- 226 श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री आण्णासाहेब सिताराम शेलार यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर, प्रा. लक्ष्मण हाके सर,प्रा. नवनाथ (आबा) वाघमारे, तय्यब जाफर (मुस्लिम नेता)
ॲड. अरुण जाधव (राज्यप्रवक्ता वंचित बहुजन आधाडी)
सुरेखाताई पुणेकर यांची शनिवार दि. १६ नोव्हेंबर २०२४ रोजी श्रीगोंदा येथे दुपारी 2 वाजता जाहीर सभा होणार असल्याची माहिती वंचित चे उमेदवार श्री आण्णासाहेब शेलार आणि वंचितचे प्रदेश प्रवक्ते, ॲड अरुण जाधव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना आण्णासाहेब शेलार यांनी सांगितले की,दुर्लक्षित, कष्टकरी, शेतकरी आणि नागरिकांचा त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. यामुळे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीचा अनुभव असल्यामुळे, विधानसभा निवडणुकीत यश मिळवणे सोपे जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते अरुण जाधव यांनी जरांगे फॅक्टरवर बोलताना सांगितले. की ॲड.प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणाला कधीच विरोध केला नाही उलट पाठिंबा दिला मात्र ओबीसी कोटयातुन न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे. मात्र जरांगे यांनी ओबीसीतुन आरक्षणाचा हट्ट सोडला नाही.असे त्यांनी नमूद केले.
या पत्रकार परिषदेस अण्णासाहेब शेलार, अरुण जाधव, संतोष भोसले, ओंकार शिंदे यांच्या सह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
