श्रीगोंद्यात पोलिस कॉन्स्टेबल लाच घेताना रंगेहात जाळ्यात
श्रीगोंद्यात पोलिस कॉन्स्टेबल लाच घेताना रंगेहात जाळ्यात
श्रीगोंदा प्रतिनिधी– अमोल बोरगे
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर यांनी श्रीगोंदा येथे सापळा रचून पोलिस कॉन्स्टेबल संभाजी शिवाजी घोडे (वय 32, रा. श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांना 3,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
तक्रारदार महिलेच्या मुलाविरुद्ध तक्रार दाखल होऊ नये आणि मोबाईल परत मिळावा यासाठी सुरुवातीला 20,000 रुपयांची मागणी करण्यात आली. नंतर रक्कम कमी करून 3,000 रुपये ठरविण्यात आले. तक्रारदारांनी लाच न देता थेट एसीबीकडे धाव घेतली. 11 आणि 12 ऑगस्ट रोजी पडताळणी केल्यानंतर 12 ऑगस्ट रोजी सापळा रचण्यात आला आणि आरोपीने तक्रारदारांकडून स्वतः 3,000 रुपये घेताच एसीबी पथकाने त्याला ताब्यात घेतले.
या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या पथकाने मा. भारत तांगडे, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक मो. क्र.8888832146. मा. माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि,नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मो.क्र.9922266048 व पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.
तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल रवी निमसे पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब कराड, पोलीस कॉन्स्टेबल वैभव सुपेकर चालक पोलीस हवालदार हारून शेख, चालक पोलीस हवालदार लाड सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर ये अधिकारी सापळा पथक मध्ये सामील होते
एसीबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्याच्या वतीने कोणीही लाच मागितल्यास तात्काळ 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
ही कारवाई होताच श्रीगोंदा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते टिळकजी भोस तसेच त्यांचे सहकारी तसेच श्रीगोंदेतील अनेक नागरिकांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन समोरील शनि चौकामध्ये फटाकड्यांची आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा केला
