साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड-किसनराव पावडे पाटील
साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड-किसनराव पावडे पाटील .
प्रतिनिधी :- सुदाम दरेकर :-
साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी अतिशय योग्य व्यक्तींना दिला आहेच , पण आमच्या पारनेर तालुक्यातील पळसपूर च्या भूमिपुत्राला दिला, याचा मला सार्थ अभिमान आहे , असे गौरवोद्गार मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी किसनराव पावडे पाटील यांनी काढले आहे .
घाटकोपर येथे महापालिका माध्यमिक शिक्षक संघ आणि पतसंस्था यांच्या वतीने सालाबादप्रमाणे दिला जाणारा ” साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार ” या वर्षी शिव महानगर पालिका माध्यमिक शाळेतील जेष्ठ शिक्षक भाऊसाहेब आहेर सर यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला .
ज्येष्ठ शिक्षक भाऊसाहेब आहेर यांना सन्मान चिन्ह , मानाची शाल , फेटा , पुष्पगुच्छ व रोख रक्कम आमदार राम कदम यांच्या हस्ते व प्रसिद्ध मराठी विनोदी अभिनेता पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे , संस्थापक अध्यक्ष सहकार मित्र सुरेश डावरे सर, मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी किसनराव पावडे पाटील , नगरसेवक प्रकाश गंगाधरे ,आप्पासाहेब बागल या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आला. भाऊसाहेब आहेर यांनी शैक्षणिक, सामजिक ,व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला . या कार्यक्रम प्रसंगी प्रशासकीय अधिकारी किसनराव पावडे पाटील मनोगत व्यक्त करताना पुढे म्हणाले की , आपल्या संस्थेने आदर्श शिक्षक आहेर सर यांच्या सारख्या अगदी योग्य व्यक्तीची निवड करून सन्मानाची उंची तर वाढवलीच , पण त्याचबरोबर आहेर सरांची जबाबदारी ही वाढली आहे , असे गौरवोद्गार काढले . आहेर यांचे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई नगरी बरोबरच त्यांची मायभूमी असलेल्या पारनेर तालुक्यातील विविध स्तरातून कौतुक केले जात आहे .
या कार्यक्रमाला शैक्षणिक , सामाजिक व सहकार क्षेत्रातील रोहकले ,चौधरी , शेळके , गुंड ,पारधी ,महेश ,रोकडे ,उचाळे , दत्ता गावडे , आवारी ,हांडे , वाळुंज ,सतीश औटी,ईश्वरकट्टी , गवंडी , पवार , राठोड ,संतोष कातकडे व इतर मान्यवर उपस्थित होते. अप्पासाहेब बागल यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
