ताज्या घडामोडी

सुपा येथे टायर कंपनीला आग – मनसे नेते रविश रासकर आक्रमक सुपा MIDC मधील कंपनी मद्ये कामगारांसाठी सुरक्षा व इतर सुविधा नसेल अशा कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात – मनसे

सुपा येथे टायर कंपनीला आग – मनसे नेते रविश रासकर आक्रमक

सुपा MIDC मधील कंपनी मद्ये कामगारांसाठी सुरक्षा व इतर सुविधा नसेल अशा कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात – मनसे

पारनेर सुपा प्रतिनिधी / प्रतिक शेळके

 

 

 

 

 

VIJI Rubber & Still pvt Ltd या टायर कंपनीला भयानक आग…. मनसे नेते रविश रासकर आक्रमक.
VIJI Rubber Still pvt Ltd ही टायर कंपनी सुपा जुन्या एमआयडीसीमध्ये आहे. या कंपनीला सकाळी तुफान आग लागली होती . या कंपनीला सेफ्टी कोणतीही यंत्रणा नव्हती व अग्निशामक गाडी पण नव्हती. बाहेरून गाडी बोलावण्यात आली होती गाडी तोपर्यंत खूप वेळ झाली होती.आणि ही आग एवढी भयानक होती की शेजारी According Organic pvt Ltd ही तुफान केमिकल ची कंपनी आहे. जर त्या कंपनीला या आगेची झळ लागली असती तर भयानक स्पोट झाला असता आणि होणाऱ्या जीवित हानीस कोण जबाबदार राहिले असते त्यामुळे अशा घटना वारंवार होऊ नये यासाठी मनसे नेते रविश रासकर यांनी तहसीलदार साहेब, पारनेर उपअभियंता साहेब अहिल्यानगर एमआयडीसी कार्यालय नवनागापूर आणि जिल्हाधिकारी , साहेब अहिल्यानगर यांना निवेदनाद्वारे एक या कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे आणि अशा घटना परत घडू नये म्हणून रबलच्या आणि टायर कार्बनच्या जेवढ्या कंपन्या असतील त्यांचे ऑडिट करून ज्या बेकायदेशीर टायर कंपन्या आहेत त्या कंपन्या त्वरित सील करण्यात याव्या यासाठी निवेदन दिले आहे. आणि ज्या कंपनी मद्ये कामगारांसाठी सुरक्षा व बाकी काही नसेल अशा कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात यावे. तसेच झाले नाही आणि अशा घटना जर परत वारंवार घडल्या तर मनसे नेते रविश रासकर हे एमआयडीसी कार्यालय नाहीतर प्रदूषण विभाग अहिल्यानगर या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन किंवा उपोषण करतील असा इशारा देण्यात आला आहे. असे निवेदन पारनेर तहसीलदार सौदाने मॅडम, प्रदूषण विभाग अहील्यानगर, जिल्हाधिकारी कार्यालय, आणि एमआयडीसी कार्यालयं यांना मनसे नेते रविश रासकर आणि सूपा मनसे शहर उपाध्यक्ष संदीप चव्हाण यांनी निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!