पत्रकार पंकज गणवीर यांना राज्यस्तरीय पत्रकाररत्न पुरस्कार प्रदान
पत्रकार पंकज गणवीर यांना राज्यस्तरीय पत्रकाररत्न पुरस्कार प्रदान
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
दै लोकमत चे पत्रकार पंकज गणवीर यांना एक मैफिल कवितांची साहित्य मंच महाराष्ट्र राज्य आयोजित भव्य राज्यस्तरीय काव्य स्पर्धा १६ / २ /२०२५ रोजी पार पडला त्यामध्ये सत्यशोधक विचारमंथन आश्रम पिंप्री कोलंदर तालुका श्रीगोंदा येथे राज्यस्तरीय पत्रकाररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी पुरस्कार स्विकारताना हभप बाळासाहेब धोत्रे महाराज जेष्ठ साहित्यीक गझलकार रज्जाक शेख , प्रसिद्ध युवाकवी सागर काकडे लेखक नेमका हात कोणाचा? (कवितासंग्रह ), मा मोहनराव आढाव ( उद्योजक ‘ सरपंच अरणगांव दुमाला . उद्योजक सचिन कातोरे तसेच अनेक मान्यवर कवी उपस्थित होते .
