शिव पाणंद शेतरस्ते खुले करून राहूरी तालुक्याची राज्यात नवी ओळख करू- शरद पवळे (महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते) राहुरी शासकीय विश्रामगृहावर शिव पाणंदच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक संपन्न
शिव पाणंद शेतरस्ते खुले करून राहूरी तालुक्याची राज्यात नवी ओळख करू- शरद पवळे (महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते)
राहुरी शासकीय विश्रामगृहावर शिव पाणंदच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक संपन्न
प्रतिनिधी :- सुदाम दरेकर पारनेर :-
आज दिनांक 20 जुलै 2025 रोजी राहुरी विद्यापीठातील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य शिव पाणंद रस्ता समिती चळवळीचे प्रणेते श्री शरद पवळे यांच्या बरोबर राहुरी तालुक्यात प्रलंबित शिव पाणंद रस्ते शिवरस्ते शेतरस्ते याबाबत चर्चा करण्यात आली आहे या राहुरी तहसीलदार यांना अनेक वेळा निवेदन देऊनही राहुरी तालुक्यातील रस्ते खुले झालेले नाही शासनाने अनेक वेळा जीआर काढले परंतु त्याची तालुकास्तरीय अंमलबजावणी होत नाही . ही परिस्थिती जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे रस्त्यांचे प्रश्न कायमस्वरूपी प्रलंबित राहत आहे शेतकरी अनेक वर्ष कोर्टकचर्यामध्ये चकरा मारतात परंतु त्यांना न्याय मिळत नाही त्यासाठी माननीय श्री शरद पवळे साहेब यांनी शिवपानंद शेत रस्ता चळवळ हाती घेतली आहे गेली अनेक वर्ष ते सातत्याने प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करत आहेत अनेक वेळा निवेदने प्रत्येक जिल्हाधिकारी यांना दिलेले आहेत तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये पेरू वाटप आंदोलन केलेले आहे याची दखल घेऊन मान्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिव पाणंद रस्ते शेत रस्ते शिव रस्ते त्वरित खुले करण्याचे आदेश दिलेले आहे परंतु त्याची अंमलबजावणी होताना कुठेही दिसत नाही त्यासाठी राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन माननीय पवळे साहेबांना एकदा राहुरी तालुक्यात शेतकऱ्यांसाठी मेळावा घेण्याची विनंती केलेली आहे माननीय शरद पवळे यांनी लवकरच राहुरी तालुक्यात मेळावा घेण्याची तयारी दर्शविली आहे त्यासाठी आज राहुरी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये महराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, महेश पटारे,संतोष थोरात. सागर गांधले. भाऊसाहेब तेलोरे. सुदाम जवरे. गणेश जवरे. प्रशांत शेटे. भाऊसाहेब शेटे. बाळासाहेब पवार. सोमनाथ शेलार. राजेंद्र देठे. लक्ष्मण जाधव, विजय हापसे इ. राहुरी तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
