दानेवाडी येथे मृतदेह मिळून पाच दिवस उलटले तरी अद्याप तपास नाही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह ग्रामसभेत ग्रामस्थांचा आरोप , नगर पुणे रोड वरती ग्रामस्थ करणार रस्ता रोको आंदोलन .
दानेवाडी येथे मृतदेह मिळून पाच दिवस उलटले तरी अद्याप तपास नाही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह ग्रामसभेत ग्रामस्थांचा आरोप ,
नगर पुणे रोड वरती ग्रामस्थ करणार रस्ता रोको आंदोलन .
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे शिर तुटलेल्या अवस्थेत विहिरीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख झाली नाही व माउली सतीश गव्हाणे याचा अजून तपास नाही या मुळे ग्रामस्थांनी दिं 14 मार्च रोजी गावामध्ये सभा आयोजित केली होती या सभेसाठी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेमध्ये ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाच्या तपासावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करून पोलीस प्रशिक्षणावर ताशेरे ओढले आहेत त्यामध्ये काही ग्रामस्थ आपल्या भावना व्यक्त करताना म्हणले आहेत की मंत्र्याच्या मुलाचा दोन तासात तपास लागतो व पाच दिवस उलटूनही ह्या निघृण हत्याकांडाचा तपास व सुगावा पोलिसांना कसा लागत नाही व तालुक्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी मंत्रालयातून तपासाचे सूत्र जलद गतीने फिरवावी अशा सूचना देऊनही पोलीस प्रशासन फक्त तपास चालू आहे असे सांगत आहे ? माऊली गव्हाणे बेपत्ता असल्याचा तपास शिरूर पोलिसांनी व्यवस्थित केला नाही त्यामुळे शिरुर पोलिसांवर ग्रामस्थ नाराज आहेत व त्यांच्या कार्यक्षमतेवर ग्रामस्थांनी शंका उत्पन्न केली आहे.त्यामध्ये शिरूर पोलीस म्हणत आहेत आमच्याकडे फक्त बेपत्ता झाले ची तक्रार आहे व बेलवंडी पोलीस स्टेशन म्हणत आहेत हा मृतदेह कोणाचा आहे हे माहीत नाही. त्यामुळे ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाल्याचे दिसत आहे ग्रामस्थांनी या प्रकरणासाठी एसआयटी ( SIT ) नेमावी व हा तपास सीआयडी (CID ) कडे वर्ग करावा अशी मागणी करत आहेत अन्यथा येत्या मंगळवारी पुणे नगर महामार्गावरती १७ कमानीच्या
पुलावरती दाणेवाडी व राजापुर ग्रामस्थ रस्ता रोको आंदोलन करणार आहेत असा इशारा या सभेमध्ये पोलीस प्रशासनाला ग्रामस्थांनी दिला आहे.नगरचे पोलीस अधीक्षक यांनी २४ तासात तपास पूर्ण होईल असे दाणेवाडी ग्रामस्थांना आश्वासित केले होते परंतु तीही वेळ गेल्यामुळे ग्रामस्थ संभ्रमात पडले आहेत.
सविस्तर काय घटणा आहे पाहु !
श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे येथे शिर तुटलेल्या अवस्थेत विहिरीत सापडलेल्या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नाही.त्याचे डीएनए मॅच करण्याचे काम अहिल्यानगर येथील प्रयोगशाळेत घेतल आहे परंतु तो आहवाल नाशिक व इतर ठिकाण वरून कधी येईल हे पोलीस यांच्याकडून सांगण्यात येत नाही .दरम्यान, अहिल्यानगर व शिरूर स्थानिक गुन्हे शाखेने याप्रकरणी चौकशीसाठी निमोणे गावातून सहा तरुणांना ताब्यात घेतले होते. त्यातून काही धागेदोरे पुढे येण्याची शक्यता होती परंतु त्यातून ही काही माहिती मिळाली नाही आशी अधिकृत माहिती मिळत आहे .बेलवंडीसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शिरूरसह पुणे ग्रामीणची स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास व या चारही पथकांनी आतापर्यंत दिवस रात्र विविध मार्गांनी तपास यंत्रणा राबवित आहे . दरम्यान, दाणेवाडी येथील माउली सतीश गव्हाणे (वय १९) हा तरुण गेल्या आठवडाभरापासून बेपत्ता आहे. त्याचे वर्णनही मृतदेहाशी मिळते-जुळते असल्याने त्याचे कुटुंबीय व नातेवाईक हादरून गेले आहेत. शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी आलेल्या माउलीला मी पाहिले असल्याची माहिती देणाऱ्या त्याच्याच नात्यातील मुलीचा जबाब शिरूर पोलिसांनी नोंदविला. या जबाबात तिने याबाबत ठाम माहिती न दिल्याने पोलिसांनी महाविद्यालयाचे सीसीटीव्ही ( CCTV ) फुटेज तपासले. मात्र,त्यात माउलीचा ठाव ठिकाण दिसून आला नाही. शिवाय ( दिं ६) रोजी रात्री तो घरातून बाहेर पडल्यानंतर त्याचा फोन बंद झालेला आहे, तसेच त्याचे शेवटचे लोकेशन हे घराजवळ दाखविले असल्याने पोलिसांनी दाणेवाडीवरच लक्ष केंद्रित केले आहे. दाणेवाडी येथील मृतदेहाबाबत इतर अवयव न सापडल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.याबाबत बेपत्ता माउली गव्हाणे याच्या नातेवाईकांनी गुरुवारी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत तातडीने तपास करावा, अशी मागणी केली आहे.
