देवदैठण विद्याधाम प्रशाला मल्हार करंडकाचे मानकरी जेएसपीएम कॉलेज वाघोली येथे आयोजन १६० शाळांचा सहभाग
देवदैठण विद्याधाम प्रशाला मल्हार करंडकाचे मानकरी
जेएसपीएम कॉलेज वाघोली येथे आयोजन
१६० शाळांचा सहभाग
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेने जे .एस .पी .एम कॉलेज वाघोली येथे आयोजित यंदाचा राज्यस्तरीय मल्हार करंडक पटकावला आहे .
यात क्रीडा , वक्तृत्व , गायन , विज्ञान प्रदर्शन , रांगोळी, मेहंदी, पोस्टर पेंटींग , निबंध , नृत्य अशा विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले होते .यात १६० शाळांनी सहभाग घेतला होता . विद्याधाम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सर्व क्रीडाप्रकार व स्पर्धेत सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपदाचा मल्हार करंडक पटकावला .
यामध्ये रस्सीखेच स्पर्धेत मुले व मुलींच्या दोन्ही संघांनी प्रथम क्रमांकासह प्रत्येकी ३ हजार रु . व चषक मिळवला. वक्तृत्व स्पर्धेत देवेंद्र ओहोळ याने द्वितीय क्रमांकासह रोख ३०० रु व चषक पटकावला . तर कॅरम स्पर्धेत लक्ष्मीकांत बनकर याने द्वितीय क्रमांकासह रोख ३०० रु व चषक पटकावला .
मुख्याध्यापक विशाल डोके यांना राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद शिक्षक रत्न पुरस्कार ,ट्रॉफी व ५ हजार रु . रोख देण्यात आले .
प्रशालेत झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी भिवराबाई सावंत पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ . पी . टी .काळे , डॉ . एम .एस . यादव प्रा . एस .एम . माळी , प्रा . राहुल डावखर ,प्रा .मेघा शेळके , प्रशालेचे मुख्याध्यापक विशाल डोके , पर्यवेक्षक नामदेव डुंबरे व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्रीडाशिक्षक संदीप घावटे यांनी केले .
