निघोज परिसरात सार्वजनिक विकास कामांची आवड असणारे अवलिया ज्ञानदेव लंके
निघोज परिसरात सार्वजनिक विकास कामांची आवड असणारे अवलिया ज्ञानदेव लंके :-
” व्यक्ती विशेष ” .
प्रतिनिधी :- सुदाम दरेकर पारनेर :-
निघोज परिसरातील सर्वच मंदीरे , कुंड परिसर , दशक्रिया विधी स्थळ , बाजार तळ , पालखी विसावा वा इतरत्र सातत्याने लक्ष देवून काही कमतरता , अस्वच्छता जाणविल्यास संबंधीतांच्या निदर्शनास आणून कामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणारे , प्रसंगी पदरमोड करून खिश्याला झळ बसवून घेणारे , तसे दुर्मिळच , पण श्री मळगंगा मातेच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या श्री क्षेत्र निघोज नगरी मध्ये असे एक अवलिया आहेत , दुसरे , तिसरे कोणी नसून कोणत्याही पदावर कार्यरत नसलेले , पण सामाजिक कार्याची मनस्वी आवड असणारे ज्ञानदेव लंके ऊर्फ माऊली शेठ होय .
महिन्यातील काही दिवस मुंबईतील कुलाबा येथे व्यवसाया निमित्त राहणारे व जास्तीत जास्त दिवस व क्षण आपल्या मातृभूमी असलेल्या श्री क्षेत्र निघोज नगरीला व ग्रामदैवत असलेल्या श्री मळगंगा मातेच्या सेवेला वाहून घेणारे प्रसिद्ध उद्योजक व श्री मळगंगा देवस्थान चे माजी कोषाध्यक्ष ज्ञानदेव लंके ऊर्फ माऊली शेठ यांना या परिसरात न ओळखणारा विरळच . गावातील श्री मळगंगा मातेचे सकाळी दर्शन घेतल्या नंतर श्री राम , श्री मारुती , श्री महादेव देवांच्या मंदीरात जावून नतमस्तक होवून श्रद्धा पुर्वक दर्शन घेवून येथे काही कमतरता आहे का ? पुरेशी स्वच्छता आहे का ? काही कामे करणे आवश्यक आहे का ? याकडे स्वतःच्या नजरेने व बारकाईने लक्ष देवून संबंधीतां कडून ही अपुरे कामे करून घेत, प्रसंगी स्वतः च्या खिश्याला पदरमोड करून कामे करून करून , समाधाना चा श्वास सोडणारे , म्हणून सातत्याने विकास कामांचा पाठपुरावा करणारे माऊली शेठ , वेळप्रसंगी कोणी मदत केली, तर घेतली , नाही केली , तर वेळप्रसंगी स्वत : च्या खिश्याला झळ सोसवून लोकसहभाग व लोकवर्गणीतून अनेक विकास कामे मार्गी लावली व उर्वरित कामे ही मार्गी लावली जात आहे .त्यात उल्लेखनीय काम म्हणजे गावातील कोणाही व्यक्ती चे निधन झाल्यानंतर होणाऱ्या अंत्यविधी च्या स्मशान भूमी च्या भिंतींना रंगरंगोटी करून त्या थोर संतांची अभंगवाणी सुंदर व सुवाच्च हस्ताक्षरात लिहिण्याचे कामासाठी ५० हजार रुपयांचे योगदान दिले असून ते काम ही लवकरच पुर्ण झाल्यावर दुःखद अंतःकरणाने उपस्थितांना वारकरी संप्रदायातील या अभंगवाणी वाचल्याने त्यांचे दुःख कमी होणार आहे . तदनंतर १० दिवसांनंतर होणाऱ्या दशक्रिया विधीसाठी जमा होणारे ग्रामस्थ व पै पाहुण्यांना ऊन , वारा , पाऊस यांच्याशी सामना करत उघड्यावर बसावे लागत असे , नेमकी ही बाब हेरून माऊली शेठ यांनी दशक्रिया विधीसाठी ४० X ९५ आकाराचे मोठे पत्र्याचे शेड ६ लाख १२ हजार रुपयांमध्ये उभे केले , याचा उपभोग आता खऱ्या अर्थाने सर्व जण घेतात . शिवाय यात्रा काळात ही यात्रेकरू या ठिकाणी आसरा घेतात . भाविक भक्त त्याचबरोबर बाजार तळावर लोक वर्गणी व लोकसहभागातून ५ लाख ९० हजार रुपयांचे मोठे पत्रा शेड उभे केल्याने बाजारकरूंबरोबर च इतरांनाही त्याचा उपयोग होवू लागला . तद्नंतर गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री मळगंगा माता मंदिरासमोरील अग्नी कुंडाच्या होमासाठी स्टिल चे रेलिंग २३ हजार ५०० रुपयांत उभे केल्याने मंदिराच्या वैभवात भर पडली . तर यात्रा उत्सव , नवरात्र उत्सव वा इतर वेळेस श्री मळगंगा माते चा पालखी सोहळा ज्या वेळी कुंड पर्यटन स्थळी नेला जातो , त्यासाठी देवीच्या पालखी ला विसावा घेण्यासाठी मंदिरापासून कन्या विद्यालय व शासकीय प्राथमिक केंद्राजवळ पालखी विसावा बांधण्यात आला , याच्या संरक्षणासाठी ४५ हजार रुपये खर्चून संरक्षण लोखंडी जाळी बांधून घेतली , त्यामुळे या पालखी मार्गाच्या वैभवात भर पडून संरक्षण ही झाले . कुंड रोड वरील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळे जवळ ५१ हजार रुपये खर्चून लवकरच गाय , वासरू यांचे राखोळी शिल्प उभे राहत आहे . हे काम ही सुरू होत आहे . यामुळे कुंड रोड च्या वैभावात भर पडणार आहे , तर या कामांबरोबर च गावातील हिंदवी शिक्षण संस्थेच्या विद्यालयास शिक्षणासाठी ५१ हजार रुपयांची मदत स्वच्छेने केली आहे . तुकाई मळ्यातील तुकाई मंदिरातील फरशी साठी ही ५१ हजार रुपयांची मदत केली , त्यांनी फक्त निघोज परिसरातच विकास कामे केली, वा जवळा येथील श्री धर्मनाथ मंदिराला आतून व बाहेरून ऑईल पेन्टींग चे काम ही स्वेच्छेने दिले आहे . ते कोठे ही बाहेर गावी असताना त्यांना वाटले की , या ठिकाणी या गोष्टीची आवश्यकता वा कमतरता आहे की , लगेच ते काम करून घेतात , अगदी स्वतः ची पदरमोड करून काम करून घेतात . अलिकडच्या काळात अशी दानशूर व्यक्ती शोधून ही सापडणे शक्य नाही .
माऊली शेठ आता सध्या कोणत्याही पदावर वा सत्ता स्थानावर नाही . तरी देखील पोट तिडकीने गावातील समस्या मांडून त्या मार्गी लावण्यासाठी झटत असतात . मध्यंतरी त्यांनी कुंड पर्यटन स्थळावरील जग प्रसिद्ध असलेले कुंडामधील रांजण खळग्यांमधील १३६ ट्रॅक्टर भरून मोठ्या प्रमाणावर कचरा बाहेर काढून परिसर स्वच्छ केल्याने परिसर लख्ख झाल्याने वैभवात भर पडली . कुंड पर्यटन स्थळ मोठ्या प्रमाणावर विकसीत करून येथे आलेल्या भाविक भक्तांसाठी बोटींग ची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे . त्यादृष्टीने त्यांचे नियोजन सुरू आहे .
कोणतेही सार्वजनिक काम करताना ते मनापासून स्वतः वा लोकसहभागातून केल्याने त्याचा आनंद काही औरच असतो , श्री मळगंगा देवस्थान ट्रस्टचे माजी कोषाध्यक्ष ज्ञानदेव लंके ऊर्फ माऊली शेठ यांच्याकडे पाहून जाणवते , तोंडात कायम श्री क्षेत्र आळंदीच्या संत ज्ञानेश्वरांचे नामस्मरण माऊली या नावाने हात जोडत , सदा हसत मुख असणारे व्यक्तीमहत्त्व विरळच , बोला श्री मळगंगा माते की जय . . . . . .
