पारनेर तालुक्यातील काटाळवेढे येथील तलावाच्या पाण्याच्या बेकायदेशीर उपशावर तातडीने कार्यवाही करा – सोपान गुंड
पारनेर तालुक्यातील काटाळवेढे येथील पाझर तलावाच्या पाण्याच्या बेकायदेशीर उपशावर तातडीने कार्यवाही करण्याबाबत ग्रामसेवक सरपंच तलाठी यांना दिले निवेदन
पारनेर प्रतिनिधी :-
काटाळवेढे येथील पाझर तलावातील बेकायदेशीर उपसा होत असल्याचे सोपान गुंड यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकाराकडे लक्ष वेधले व त्यांनी ही बाब गावातील ग्रामस्थांच्या लक्षात आणून दिली. पाझर तलावातील लागू असलेल्या नियमानुसार केवळ पाझरलेले पाणीच उपसनेचा अधिकार आहे. मात्र काही व्यक्ती या नियमांचे उल्लंघन करून तलावातील पाण्याचा बेकायदेशीर उपसा करत आहेत असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे गावातील पाणी व्यवस्थापनावर नकारात्मक परिणाम होत आहे असे त्यांनी सांगितले. तसेच जल स्रोतांचे रक्षण हे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे आहे, आणि तलावाचा योग्य वापर होण्यासाठी ग्रामपंचायतची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. असे सोपान गुंड म्हणाले आणि तलावाचा योग्य वापर होण्यासाठी ग्रामपंचायत ची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यासंदर्भात सोपान गुंड यांनी सरपंच ग्रामसेवक तसेच तलाठी यांनी याप्रकरणाची तात्काळ दखल घेऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कार्यवाही करावी तसेच पाझर तलावाच्या व्यवस्थापनासाठी ठोस उपाययोजना करून भविष्यातील जलस्रोत संरक्षण सुनिश्चित करावे असे सोपान गुंड यांनी या निवेदनात म्हटले आहे..
