जिल्हा परिषदेच्या भोयरे गांगर्डा प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे ! खा.निलेश लंके यांच्या प्रयत्नातून एक वर्गखोलीसाठी १२ लाख रुपये मंजुर !
जिल्हा परिषदेच्या भोयरे गांगर्डा प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे !
खा.निलेश लंके यांच्या प्रयत्नातून एक वर्गखोलीसाठी १२ लाख रुपये मंजुर !
प्रतिनिधी :- सुदाम दरेकर पारनेर :-
शिक्षणाचा शैक्षणिक दर्जा सांभाळत विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे , म्हणून पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद भोयरे गांगर्डा प्राथमिक शाळेत आयोजीत केलेले वार्षिक स्नेहसंमेलनाचे मोठ्या उत्साहात संपन्न झाले .
भोयरे गांगर्डाचे सरपंच सौ.रोहिणी गांगड / केकडे ,उपसरपंच आदिनाथ गायकवाड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज डोंगरे, उपाध्यक्ष रवींद्र भोगाडे, माजी सरपंच शिवाजी शिंदे यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी समाजप्रबोधनपर गीते, देशभक्तिपर गीते, बालगीते, शेतकरी गीत, आणि इतर गीतांवर वैयक्तिक व सामूहिक नृत्य सादर करून पालक व ग्रामस्थांची मने जिंकली.
इयत्ता पहिली ते सातवीतील सर्व विद्यार्थ्यांनी डोळ्यांचे पारणे फेडणारा कार्यक्रम सादर केला.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन गाथेतील नाटिकेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे प्राथमिक शिक्षकच करतात.आपल्या मुलांना मोबाईल व बाह्य खाद्यपदार्थांपासून दूर ठेवण्याचा संदेश सदर स्नेहसंमेलनातून पालकांना देण्यात आला.
शाळेतील सर्व मुले आपली आहेत , असे समजून पालकांनी व शिक्षकांनी वागावे, जागरूक राहावे,स्पर्धा परीक्षांसाठी मुलांना तयार करावे , असे आवाहन ऐक्य संस्थेचे अध्यक्ष तुकाराम वाखारे यांनी केले.
जिल्हा परिषदच्या शाळेच्या आज जरी चार नवीन वर्ग तयार असले तरी , वरील मजला व चार वर्ग, वॉल कंपाउंड, गेट , बाथरूम आणि कामे संस्थेच्या व खासदार निलेश लंके , ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून एक वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा मनोदय माजी उपसरपंच दौलत गांगड यांनी व्यक्त करून आतापर्यंत चाhर ते पाच लाख रुपये लोकसहभागातून जमा झाल्याने देणगीदारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती दरेकर यांनी केले. तसेच आपल्या बहारदार आवाजाने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना रसाळ सर, संतोष लगड सर,आप्पासाहेब रसाळ यांनी अतिशय उत्कृष्टरित्या केले , तर उपस्थितांचे आभार यादव सर यांनी मानले. कार्यक्रम संपल्यानंतर तरुणांच्या सहभागातून मिष्ठान्न भोजन देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका जाधव , दरेकर मेमाने , खेडकर , गायकवाड , शिक्षक यादव सर यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमासाठी गावातील आजी-माजी पदाधिकारी , शालेय व्यवस्थापन समिती चे सर्व पदाधिकारी , विकास सेवा सोसायटीचे सर्व पदाधिकारी , गावातील सर्व महिला, गावातील तरुण ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांसाठी पालकांनी खिसा रिकामा करत सुमारे एक लाख रुपयांचा भरघोस निधी जमा केला.
[ चौकट –
ऐक्य सेवा सेंटर या संस्थेने कमिन्स इंडिया कंपनीच्या सी एस आर निधीतून अद्यावत अशी इमारत बांधली असून लोकसहभाग व संस्थेच्या माध्यमातून वॉल कंपाउंड, वॉशरूम व गेट चे काम चालू आहे.हे भरीव योगदान दिल्याने ग्रामस्थांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष तुकाराम वाखारे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
खा . निलेश लंके यांच्याकडून प्राथमिक शाळे च्या एक वर्ग खोलीसाठी १२ लाख रुपयांचा निधी नुकताच मंजुर करण्यात आलेला असुन ऐक्य संस्थेच्या माध्यमातून शाळा इमारत सह, R 0 प्लांट, वृक्षारोपण, गोबर गॅस युनिट, सी सी टी चर यासारखी कामे नियोजनपूर्वक करण्यात आलेली आहेत.त्याबद्दल संबंधित दिणगी दाते व अधिकाऱ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.लोकसहभागा व पालक वर्गातून, इतर सी एस आर फंडांतून खा . निलेश लंके यांच्या सहकार्यातून एक वर्षांमध्ये शाळेचे उर्वरित काम पूर्ण करण्याचा आम्ही मनोदय ठेवला आहे .
दौलत गांगड ,
माजी उपसरपंच ,
भोयरे गांगर्डा . ]
