राज्यस्तरीय स्पर्धेसाठी चार खेळाडूंची निवड जिल्हास्तर सबज्युनिअर स्पर्धेत यश
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी चार खेळाडूंची निवड
जिल्हास्तर सबज्युनिअर स्पर्धेत यश
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेच्या खेळाडूंनी जिल्हास्तर सबज्युनिअर स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यामुळे चार खेळाडूंची राज्यस्तरीय सबज्युनिअर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे नुकत्याच जिल्हास्तरीय सब ज्युनिअर मैदानी स्पर्धा संपन्न झाल्या यात प्रशालेच्या २५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता .
यामध्ये १२ वर्ष वयोगटात अत्रेजा भोंडवे हिने लांब उडी मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला तर १४ वर्ष वयोगटात लांब उडीत पायल लामखडे हिने द्वितीय क्रमांक ,अथर्व बोबडे याने द्वितीय क्रमांक तर
सार्थक ढवळे याने तृतीय क्रमांक पटकावला .
या सर्व खेळाडूंची २२ व २३ फेब्रुवारी रोजी पंढरपुर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
या सर्व खेळाडूंना क्रीडाशिक्षक संदीप घावटे , कांता मांडगे , सोनाली शेळके यांचे मार्गदर्शन लाभले .
या सर्वांचे शिरुर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष अनिल बोरा ,सचिव नंदकुमार निकम सर ,शाळा समितीचे अध्यक्ष चंदुलाल चोरडिया , मुख्याध्यापक विशाल डोके , पर्यवेक्षक नामदेव डुंबरे यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या .
