सुरेगाव या ठिकाणी गळ्याला कोयता लावून टाकलेल्या दरोड्यात लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास
सुरेगाव या ठिकाणी गळ्याला कोयता लावून टाकलेल्या दरोड्यात लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास
श्रीगोंदा प्रतिनीधी – अमोल बोरगे
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुरेगाव या ठिकाणी राहणाऱ्या रोडे याच्या घरी दगडाने घराचा दरवाजा तोडून घरातील लोकांच्या गळ्याला कोयता लावून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र या प्रकरणात पोलिसांना अजूनही कसलाच सुगावा लागला नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील पप्पू चंद्रकांत रोडे, वय 33 वर्ष.रा जांभळपट्टी सुरेगाव ता श्रीगोंदा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि दि २ फेब्रुवारी रोजी रात्री १० चे सुमारास जेवण करून झोपले असता दि ३ फेब्रुवारी पहाटे २ चे सुमारास अचानक घराच्या दरवाज्यावर काहीतरी आदळल्याचा मोठा आवाज झाल्याने फिर्यादी जागे झाले व त्यांनी पहिले कि घराचा दरवाजा मोठ्या दगडाने तोडुन उघडलेला होता, व त्यांचे समोर अनोळखी 30 ते 35 वयाचे तीन इसम त्यांनी पेंट, काळे जॉकेट व मफलर घातलेले, त्यांचे हातात उस तोडण्याचे कोयते, तलवार व गज असे हत्यार होते ते मराठी व अर्धवट हिंदी भाषेत बोलुन फिर्यादी व त्याची पत्नी व मुलगा त्यांना व त्यांचे आई वडील व भाउ भावजयी मुले असलेल्या दुस-या रुमुमध्ये, गळ्याला, कोयते लावुन सर्वाना चला म्हणुन नेले तेंव्हा शेजारील रुमचा देखिल दरवाजा तोडलेला होता व त्यांचेजर्वळ अनोळखी 35 से 40 वयाचे अनोळखी 4 इसम त्यांनी पेंट, काळे जॉकेट व मफलर घातलेले, त्यांचे हातात उस तोडण्याचे कोयंते काठी व गज असे हत्यार घेवून उभे होते.तेंव्हा त्यांनी सर्वांना धमकावुन म्हणाले की सर्वांनी शांत बसायचे व घरातील सर्व मौल्यवान चीज वस्तू पैसे, डाग दागिने, मोबाईल काढून दयायचे. असे त्यांनी सांगितल्याने फिर्यादीचे आई वडीलांनी ओरडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण करुन शांत बसवले. त्यानंतर सर्वानी अंगावरील सर्व दागिने, मोबाईल काढुन दिले. व नंतर त्यांनी स्वताः घरातील इतर वस्तुंची उचक पाचक करुन घरात पलंगात व शोकेसमध्ये असलेली सोन्याचे दागिने व रोख रक्कम व घरातील इतर किंमती वस्तु काटुन घेतल्या त्यामध्ये अलका रोडे यांचे ६२५०० रु किमतीचे २.५ सोन्याचे दागिने,२ हजार रुपये किमतीचे जोडवे,१३७५००रु किमतीचे दीपाली रोडे यांचे दागिने,४ हजाराच्या चांदीच्या पट्ट्या,१६००००रु किमतीचे दीपाली रोडे यांचे सोन्याचे दागिने व ४ हजाराच्या चांदीच्या पट्ट्या,१० हजाराचा सॅमसंग एलईडी,९ हजाराचा ओपो मोबाईल,तसेच १००००० रुपये रोख रक्कम असा एकूण तब्बल ४ लाख ८९ हजाराचा मुद्देमाल चोरटयांनी लंपास केल्याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संतोष भंडारी हे करत असून घटनास्थळी जाऊन त्यांनी भेट देऊन तपासाचे सूत्र जलद गतीने सुरू आहे . घटनेच्या उलगडा करण्यासाठी व आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळे पथके आरोपीच्या मागावर रवाना केली आहे अशी माहिती मिळत आहे .
