ढवळगाव मध्ये कत्तल खाण्यासाठी जाणारे ८० जनावरे तरुणांनी पकडले .
ढवळगाव मध्ये कत्तल खाण्यासाठी जाणारे ८० जनावरे तरुणांनी पकडले .
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथे विसापूर रस्त्यावरती रामबाबा मंदिर जवळ ढवळगाव येथील व शिरूर येथील बजरंग दलाच्या तरुणांनी संयुक्त मिळून अंदाजे ८० जरशी व गावरान जातीच्या वासरांना त्यांचे तोंड चिकट पट्टी ने घट्ट आवळून त्यांना घेऊन कत्तल खाण्यासाठी जाणाऱ्या एम.एच .१२ xx ०७५४ पिकप गाडीला आडवली त्यावेळी गाडीचा ड्रायव्हर अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यास यशस्वी झाला . शिरूर येथील बजरंग दल च्या तरुणांना या गाडी विषयी अनेक दिवसांपासून माहिती मिळाली होती परंतु ते अनेक दिवसापासून त्यांच्या सापळ्यातून सुटत होते परंतु आज शिरूर मधून बजरंग दलाच्या तरुणांनी ढवळगाव येथील तरुणांना संपर्क साधून गाडी विषयी माहिती सांगितली यावेळी ढवळगाव येथील शेकडो तरुणांनी सदरील संसयित गाडीचा जिवाचा कसलाही विचार न करता पाठलाग करून सदरील गाडी पकडली परंतु आंधाराचा फायदा घेऊन ड्रायव्हर पळुन जाण्यास यशस्वी झाला . सदरील माहिती बेलवंडी पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांना कळवली व त्यांनी त्याठीकाणी बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस पाठवले तसेच क्षीरसागार साहेब यांनी घटणास्थळी धाव घेऊन सदरील पिकप जनवारांना समवेत ताब्यात घेतली आहे .
शिरूर बजरंग दल व ढवळगाव येथील सर्व हिंदु धर्म रक्षक तरुणांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे .
