भारतीय बौद्ध महासभा शाखा पारनेर अंतर्गत राहुल नगर मित्र मंडळ आयोजीत त्यागमूर्ती माता रमाई जयंती महोत्सव मोठ्या जल्लोषात संपन्न
भारतीय बौद्ध महासभा शाखा पारनेर अंतर्गत राहुल नगर मित्र मंडळ आयोजीत त्यागमूर्ती माता रमाई जयंती महोत्सव मोठ्या जल्लोषात संपन्न
प्रतिनिधी पारनेर – प्रतिक शेळके
शुक्रवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका समोर पारनेर, जिल्हा अहिल्यानगर येथे भारतीय बौद्ध महासभा पारनेर अंतर्गत राहुल नगर महिला मंडळ यांच्या वतीने १२७ वी रमाई जयंती चे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुंदर सुरुवात धम्मपद मॉनेस्ट्री चे विद्यार्थी भन्तेसंघ व मान्यवरांचा हस्ते आदर्शांचे पूजन व मंगलमय वातावरणात वंदना घेऊन करण्यात आली. ऍड. मोनिका ताई सोनावणे यांनी अध्यक्ष पदाची सूचना मांडताना संपुर्ण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पारनेर नगर पंचायत च्या कोषाध्यक्ष आद. आम्रपाली यांना घोषित केले. त्यास सर्वांच्या वतीने अनुमोदन सुनीता ताई नगरे यांनी दिले. आद. ॲड.सुनिताताई शिंदे
यांनी मान्यवरांचे व उपस्थित सर्वांचे स्वागत केले.
आद. शुभांगी ताई पवार जिल्हा कोषाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा अहिल्यानगर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा व उद्देश विशद केला. कार्यक्रमाचा उद्देश सांगत असताना शुभांगी ताई पवार म्हणाल्या की महिलांचे सक्षमीकरण करणे, आपल्या आदर्शांचे विचार, रमाई ने समाजासाठी जो त्याग केला तो आपल्या पर्यंत पोहोचावा व भारतीय बौद्ध महासभा विविध प्रकारचे संस्कार शिबिरे घेतात त्या मध्ये आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊ जास्तीत जास्त शिबिरांचे आयोजन करून आपण धम्माचे आचरण करावे हे सांगितले व पारनेर शाखेने जयंती उत्सवाची संपूर्ण जबाबदारी महिल्यांवर सोपवली त्या बद्दल तालुका पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमास भैरवनाथ विद्यालयाच्या शिक्षिका आद. मिराताई पुजारी, प्राथमिक शिक्षिका आद. शेगुफा शेख मॅडम, प्राथमिक शिक्षिका ज्योती ताई साळवे यांनी उपस्थित सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देऊन त्यागमूर्ती रमाई बद्दल मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका आद. सरस्वती ताई जावळे मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी रमाई बद्दल बोलताना खूप सुन्दर रमाई चे विश्लेषण केले. बोलताना त्या म्हणाल्या रमाईने आपल्या आयुष्यामध्ये दुःखाचे अनेक डोंगर पचवले अतिशय कष्ट सोसले परंतु ती कधीही हरली नाही त्या दुःखाबरोबर कष्टा बरोबर लढली आणि बाबासाहेबांची साथ दिली ती कधीही बाबासाहेबांच्या शिक्षणाच्या मध्ये आली नाही त्याचप्रमाणे तिने आपला स्वाभिमान ही जपला रमाईच्या या त्यागाची आपण सर्वांनी आठवण ठेवणे गरजेचे आहे .
अध्यक्षीय भाषण देत असताना आद. आम्रपाली जाधव यांनी सर्वप्रथम आयोजकांचे व महिलांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सर्व सूत्र हातात घेऊन खूप सुंदर कार्यक्रम घडवून आणला व कार्यक्रमाचे खूप सुंदर नियोजन केले त्या बद्दल खूप कौतुक केले. या पुढेही महिलांनी एकत्र येऊन अश्या प्रकारे कार्यक्रम घेत राहावे अशी सूचना केली.
प्रमुख उपस्थिती मध्ये भारतीय बौद्ध महासभा जिल्हा उपाध्यक्ष आद. वीरेंद्र पवार सर, केंद्रीय शिक्षक जिल्हा सचिव आद. रेवन साळवे सर, तालुका अध्यक्ष बाबाजी वाघमारे, तालुका सरचिटणीस गिरीश गायकवाड, आद. संपत पवार, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व बौद्धचार्य, समता सैनिक, व सर्व पदाधिकारी उपस्थित होते तर, आर पी आय चे तालुका अध्यक्ष आद. किरण सोनावणे, निलेश लंके प्रतिष्ठान चे आद. अमित भाऊ जाधव, भीम आर्मी चे आद. प्रल्हादजी शिंदे साहेब, सामाजिक कार्यकर्ते आद. सचिनजी नगरे, आदि कार्यकर्ते व राहुल नगर येथील सर्व बौद्ध उपासक व उपसिका सहकुटुंब कार्यक्रमास उपस्थित होते.
तर सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य भारतीय बौद्ध महासभेचे हिशोब तपासनीस व सिद्धार्थ वस्ती गृहाचे अध्यक्ष आद. संपत पवार सर यांनी मेहनत घेतली तसेच आद. वीरेंद्र पवार सर, आद. अमित जाधव, आद. किरण सोनवणे, आद गिरीश गायकवाड, आद. चंद्रकांत गायकवाड व सर्व महिला पदाधिकारी यांनी भरपूर मेहनत घेतली.
आद. सुनीता ताई शिंदे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे खूप सुंदर व उत्तम सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाचे आभार भारतीय बौद्ध महासभा पारनेर शाखेचा महिला सचिव आद. सुनंदा ताई साळवे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचा शेवट शरणतय घेऊन स्वादिष्ट भोजनाणे झाला.
