ताज्या घडामोडीसकारात्मक

विद्यार्थ्यांनी शाळेला संगणक भेट देत व्यक्त केले ऋण दहावीच्या विद्यार्थांचा निरोप समारंभ

विद्यार्थ्यांनी शाळेला संगणक भेट देत व्यक्त केले ऋण
दहावीच्या विद्यार्थांचा निरोप समारंभ

श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे

ज्या शाळेत आपण शिकलो , संस्काराची अनमोल शिदोरी मिळवली , उज्वल भविष्याची पायाभरणी ज्या ठिकाणी झाली अशा आपल्या शाळेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेला संगणक संच भेट देत शाळेविषयीचे ऋण व्यक्त केले .
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ मुख्याध्यापक विशाल डोके यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला . यावेळी शाळेची गरज लक्षात घेऊन दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला संगणक संच भेट दिला . तसेच सर्व शिक्षकांचा भेटवस्तू देत सन्मान केला .
मुख्याध्यापक विशाल डोके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात प्रामाणिकपणे काम करा व आईवडीलांचे स्वप्न साकार करण्याची वेळ आली आहे . त्यासाठी कष्टपूर्वक प्रयत्न करण्याचे आवाहन केले .
यावेळी दहावीतील विद्यार्थी दर्शन ठाणगे , पायल बनकर , तृप्ती हार्दे , साहील कोरके या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील अनुभव मनोगतातून व्यक्त करताना या शाळेत आलो तेव्हा आम्ही चिखलाचा गोळा होतो व या सर्व शिक्षकांनी आम्हाला सुंदर मूर्तीचे रुप देण्याचा प्रयत्न केला असे सांगत आपल्या शिक्षक व शाळेविषयी ऋण व्यक्त केले .
ओमराजे आबुज , सृष्टी कोळपे , आर्या मेंगवडे , दिव्या शिंदे ,ऋतुजा होळकर , श्रावणी वाव्हळ या नववीतील विद्यार्थ्यांनी सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या .
यावेळी मनोहर परदेशी , वंदना गायकवाड , प्रमोद रुपनर , पर्यवेक्षक नामदेव डुंबरे या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमेश साळुंके , गणेश वाजे , अर्चना खंदारे , मनोहर परदेशी , सतीश झांबरे , राजेंद्र जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले .
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यार्थी देवेंद्र ओहोळ याने केले तर आभार संध्या तिवारी हिने मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!