एकाच आठवड्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी पिल्लांची आई सोबत पुनर्भेट करण्यात श्रीगोंदा वनविभाग व इको रेस्क्यू टीम ला यश
एकाच आठवड्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी पिल्लांची आई सोबत पुनर्भेट करण्यात श्रीगोंदा वनविभाग व इको रेस्क्यू टीम ला यश
श्रीगोंदा प्रतिनीधी – अमोल बोरगे
जानेवारी पासून संपूर्ण महाराष्ट्रात ऊसतोडी चालू होते याच वेळी अनेक वन्यप्राण्यांनी पिल्ले ऊसतोडी दरम्यान आढळून येतात असाच प्रकार श्रीगोंदा परिसरात घडून आला गेल्या ५ दिवसात वेळवेगळ्या ठिकाणी कोल्हा तसेच बिबट्याची पिल्ले ऊसतोडी दरम्यान आढळून आली अशी पिल्ले पुन्हा आई जवळ सोडणे अत्यंत महत्त्वाचे व आव्हानात्मक असते मादी चिडखोर होऊ नये म्हणून पिल्ले तिच्याजवळ सुरक्षित जाण्यासाठी आधुनिक कॅमेऱ्याच्या मदतीने पुनर्भेट घडवण्यात श्रीगोंदा वनविभागाला व इको रेस्क्यू टीमला यश आले
श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्रच ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी भागात मधील शिंदे माळा परिसरातील शेतकरी राम किसन शिंदे व निलेश जठार यांच्या शेतात बिबट्याचे एक पिल्लू उसतोडीत आढळून आले त्यांनी वनविभागाशी संपर्क करून माहिती दिली श्रीगोंदा वनविभाग व दौंड येथील इको रेस्क्यू टीम यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व आधुनिक ट्रॅप कॅमेरे लाऊन आई व पिल्लाची यशस्वी पुनर्भेट घडवून आणली
बिबट्या पाठोपाठ बेलवंडी परिसरातील काळाणे वस्ती जवळील शिवाजी काळाणे व यांच्या शेतात ऊसतोडी दरम्यान कोल्ह्याची चार पिल्ले आढळून आली यांचे देखील पुनर्भेट प्रक्रिया यशस्वी पार पाडण्यात वनविभागाला यश आले
एकच आठवड्यातील तिसरे श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण परिसरातील कोकाटे वस्ती येथे संतोष बनकर व उपसरपंच अनिल बनकर यांच्या शेतातील ऊसतोडी दरम्यान बिबट्याची दोन पिल्ले आढळून आली रात्री ट्रॅप कॅमेरे लावून पाहणी केली व ही देखील पुनर्भेट यशस्वी झाली
या वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रा सौ.दिपाली भगत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक चंद्रकांत मरकड,वनरक्षक दिनेश हुंबरे,वनमजूर लक्ष्मण लगड,हनुमंत रणदिवे,भरत पवार,कचरू शेख,संभाजी शिंदे,विकास चोरमले तसेच अनेक प्रसंगी श्रीगोंदा वनविभागाला मदतीस असणारी दौंड येथील इको रेस्क्यू टीम चे अध्यक्ष नचिकेत अवधानी,श्रेयस कांबळे,अभिलाष बनसोडे,भक्ती स्वामी आदि लोकांनी या संपूर्ण प्रक्रियेत सहभाग घेऊन पुनर्भेट यशस्वी करण्यात आली
