ताज्या घडामोडी

अनिकेत ढवळे व संदीप दिवटे यांची भारतीय रेल्वे मध्ये निवड

अनिकेत ढवळे व संदीप दिवटे यांची भारतीय रेल्वे मध्ये निवड

श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे

श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील अनिकेत नानासाहेब ढवळे व ढवळगावच्या शेजारील गाव अरणगाव दुमाला येथील संदीप संजय दिवटे यांची इंडियन रेल्वे टेक्निसिअन या पदावर निवड झाली.अनिकेत ढवळे व संजय दिवटे हे दोघेही सामान्य व शेतकरी कुटुंबातील असून भारतीय सैन्य व सरकारी नोकरीसाठी खूप मेहनत करत होते दिनांक १९ मार्च २०२५ रोजी त्यांचा ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचा निकाल जाहीर झाला.त्यांनी भारतीय रेल्वेमध्ये भरती होण्यासाठी आर्ज सप्टेंबर २०२४ मध्ये भरला होता व परीक्षा २४ डिसेंबर २०२४ रोजी मुंबई येथे दिली होती.त्यांच्या या यशाबद्दल ढवळगाव ग्रामस्थ व आरंगाव दुमाला ग्रामस्थ यांच्याकडून त्यांच्या शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!