पळवे खुर्द येथील जलसंधारण कामाची अधिकाऱ्यांनी केली पाहणी, झालेल्या कामाचे कौतुक
पळवे खुर्द येथील जलसंधारण कामाची अधिकाऱ्यांनी केली पाहणी, झालेल्या कामाचे कौतुक
प्रतिनिधी :- सुदाम दरेकर / पारनेर :-
पळवे खुर्द येथे टाटा मोटर्स व नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या जलसंधारणाच्या कामास टाटा स्टील झारखंडचे हेड श्री गोपाल सर, टाटा कॅपिटल चे CSR हेड श्रीम. राधा मॅडम, टाटा मोटर्स पुणे चे CSR हेड श्री लितेस सर, तसेच नाम फाउंडेशनचे CEO श्री गणेशजी थोरात साहेब,जिल्हा समन्वयक श्री संग्राम खलाटे साहेब जिल्हा संपर्क अधिकारी श्री विशाल नगरे साहेब यांनी भेट देऊन कामाची पाहणी करत झालेल्या कामाचे कौतुक केले. झालेल्या कामाची पाहणी करताना त्यांनी झालेल्या कामाची विशेष प्रशंसा केली अशा प्रकारची जास्तीत जास्त कामे घेऊन बोचाल असतं भूजल स्तर वाढविण्यात यावे अशा सूचना केल्या यावेळी टाटा मोटर्स व नाम फाउंडेशन अधिकारी यांचा सत्कार ग्रामस्थांनी केला. यावेळी तात्याभाऊ शेळके सर, सोपान पवार, पंडित देशमुख, तात्यासाहेब देशमुख, अंबादास तरटे, भाग्येश देशमुख, अनिल तरटे, प्रसाद तरटे, नानाभाऊ गाडीलकर, नंदकुमार गाडीलकर, शहाजी गुंड, राजेंद्र शेलार, सतीश शेळके, शंकर गवळी, रवींद्र नवले, नितीन गुंड, राजेंद्र शेळके, राजेंद्र शेलार, अशोक गवळी,अनिल शेळके, अमोल तरटे,सचिन शेळके, स्वप्निल शेळके, अरुण शेळके, सुनील नवले, कान्हूर पठारचे सरपंच किरण ठुबे, बापू तरटे, व अमोल शेळके आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
