घाणेगाव रोडवरील व्यंकटेश कंपनी ते पळवे खुर्द नगर पुणे हायवे पर्यंत रस्त्याची लागली वाट
घाणेगाव रोडवरील व्यंकटेश कंपनी ते पळवे खुर्द नगर पुणे हायवे पर्यंत रस्त्याची लागली वाट
प्रतिनिधी :- सुदाम दरेकर पारनेर :-
घाणेगाव पासून व्यंकटेश कंपनी पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे परंतु पुढील दीड किलोमीटर पर्यंत हे काम अजून बाकी आहे. सुरुवातीपासून या रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत प्रत्येक वेळेस पावसाळा आल्यावर ते पण खड्डे पाण्याने भरून राहतात त्यामुळे वाहन चालकांना खूप कसरत करावी लागत आहे या रस्त्यालगत जिल्हा परिषदेची शाळा आहे तसेच वस्ती आहे त्यामुळे शाळेतील मुलांना शाळेत येताना त्रास सहन करावा लागत आहे तसेच जनावरांचा चारा दूध वाहतूक करण्यास नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे वेळोवेळी तक्रार करू नही खूप दिवसापासून या रस्त्याचे काम प्रलंबित आहे या रस्त्यावरून कंपनीचे अवजड वाहनांची वाहतूक नेहमी चालू आहे हा रस्ता अरुंद असल्यामुळे शाळेतील मुलांना व वाहन चालकांना चिखलात थांबावं लागत आहे. अनेक वेळा या ठिकाणी या रस्त्यावर एक्सीडेंट पण झाले आहेत तरी पण प्रशासन याचा विचार करत नाही या रस्त्याचे काम लवकर न झाल्यास विठ्ठल वाडी तसेच तेथील परिसरातील नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे..
