उक्कडगाव मध्ये जगताप व नागवडे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान
उक्कडगाव मध्ये जगताप व नागवडे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष आणि शिवसेना
(ठाकरे गट) नेते राजेंद्र नागवडे आणि शरद पवार गटाचे (राष्ट्रवादी काँग्रेस) पक्षाचे माजी आमदार राहुल जगताप यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नुकताच प्रवेश केला.मुंबईत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत नागवडे व जगताप यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश झाला.एकाच दिवशी एकाच वेळी हा पक्षप्रवेश केल्यामुळे तालुक्यात एकच चर्चा होत आहे.दोन्ही प्रमुख नेत्यांच्या प्रवेशामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद श्रीगोंदा मध्ये वाढली आहे. येणाऱ्या निवडणुकीत त्याचा राष्ट्रवादीला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. शुक्रवार (दिं.३०) रोजी उक्कडगाव येथे या दोन्ही नेत्यांचा ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या सन्मानाने सत्कार करण्यात आला.गावातील नागवडे व जगताप गट दोन्ही एकत्र आल्यामुळे राष्ट्रवादीची ताकद भक्कम झाल्याची चित्र दिसत आहे .
या वेळी मुंजोबा विविध कार्य सेवा सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय कुंडलिक कातोरे, कुकडी.सा.का.संचालक रभाजी कातोरे,सोसायटी संचालक पंडित कातोरे, उपसरपंच प्रसाद महाडिक, मा.सरपंच बापू कातोरे, बंडू पाटील कातोरे, केशवराव महाडिक, यशवंत डेरी चेअरमन लक्ष्मण कातोरे, कातोरे मेजर,बाबुराव समगे, मुंजोबा सोसायटीचे व्हायचेरमन एकनाथ करंडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
