ताज्या घडामोडी

नाचून नव्हे तर महामानवांचे विचार आत्मसात करून जयंती साजरी करावी- प्रशांत चव्हाण

नाचून नव्हे तर महामानवांचे विचार आत्मसात करून जयंती साजरी करावी- प्रशांत चव्हाण

श्रीगोंदा प्रतिनिधी – आदेश उबाळे

क्रांतिसूर्य प्रतिष्ठान शिरसगाव बो आयोजित संयुक्त जयंती उत्सव २९ एप्रिल ( मंगळवार ) रोजी अतिउत्सवात साजरी करण्यात आली.
महामानवांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु.सतिश ओहोळ ( भारतीय बौद्ध महासभा अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीस) हे होते
चिमुकल्यांसह तरुणाई ने आपले विचार मांडले व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले .
नाचून नव्हे तर महामानवांचे विचार आत्मसात करून जयंती साजरी करावी .तरुण पिढी हि व्यसनाला बळी पडत आहे आणि त्याबद्दल चिंता व्यक्त केली. मतदारराजा जागा हो आणि लोकशाही चा धागा हो असे प्रतिपादन प्रा. व्याख्याते प्रशांत चव्हाण यांनी समाज प्रबोधन करत असताना प्रबोधित केले.
त्याचबरोबर अनिल कांबळे ( उपसरपंच ग्रा. प निर्वी), शशिकांत जगताप ( चिंचणी), ॲड महेंद्र शिंदे, कार्यक्रमाचे अध्यक्ष सतिश ओहोळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
नुकतीच जाहीर झालेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या शांताराम उबाळे ( तालुकाध्यक्ष), अमोल कांबळे ( संघटक), अनिल उबाळे (सचिव प्रचार), या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ ग्रामस्थांच्या वतीने व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी ॲड महेंद्र शिंदे, बादशहा सय्यद, दादा कोळपे, भानुदास सोमवंशी ( चेअरमन.शिरसगाव सोसा.) संतोष उबाळे, सुनील उबाळे,
, वाल्मीक दळवी, राहुल सोमवंशी, संतोष उबाळे ( मा. ग्रा पं. सदस्य), उपसरपंच अमोल उबाळे, जुबेर सय्यद ( व्हॉ शिरसगाव सोसा), पोपट उबाळे, संजय उबाळे, बाळासाहेब उबाळे त्याचबरोबर तरुण -वर्ग ग्रामस्थ उपस्थित होते.
आभार व सूत्रसंचलन संतोष उबाळे यांनी पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!